मुंबई  :  एक श्वान पाण्यावरून वेगानं धावत असल्याचं व्हीडिओत दिसतंय. पण, श्वान कसा काय पाण्यावरून धावतोय याची आम्ही पोलखोल केली. मग काय सत्य समोर आलं चला पाहुयात. (fact check viral polkhol dog walk and run in water see what is truth) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्वानाचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. नदीच्या पाण्यात गेलेल्या या श्वानाला पाहून याला चमत्कार म्हणावं की आणखी काही तेच समजेना. हा श्वान एक नदी पार करताना दिसला. पण, नदीत जाताच पोहोताना दिसला नाही तर उलट तो नदीवर उड्या मारत सुसाट धावत सुटलाय. हे कसं काय शक्य आहे? हा प्रश्न सगळ्यांना पडलाय. 



व्हीडीओत पाहू शकता एक मोठी नदी दिसतेय. श्वान या नदीत जातो. पण तो पोहोण्याऐवजी नदीच्या पाण्यात धावताना दिसतो. सुरुवातीला पाणी थोडं असेल म्हणून असं असावं असं वाटतं. पण नाही, श्वान नदीत पुढे पुढे धावत जातो. तरी तो पाण्याच्या आत जात नाही. 


एरवी सामान्यपणे श्वान जर पाण्यात असता तर त्याचं अर्ध शरीर पाण्याच्या खाली असतं. पण हा श्वान पूर्णपणे पाण्याच्या वर आहे. अगदी त्याचे पंजेही पाण्याच्या आत जात नाहीयेत. त्यामुळे आम्ही या व्हीडिओची पडताळणी केली. मग काय पोलखोल झाली पाहुयात.


व्हायरल पोलखोल


नदीत पाणी कमी आहे. इंचभर पाणी असल्याने श्वान सहज धावतोय. श्वान पाण्यावरून धावत असल्याचा दावा खोटा आहे. व्हीडिओ पाहून प्रत्येकाने आपाआपले वेगवेगळे तर्कवितर्क लढवले. काहींनी हा व्हीडिओ एडिटेड असल्याचा दावा केला. पण, हा व्हीडिओ एडिटेड नसून, नदीत पाणीच कमी असल्याने श्वान सहज धावतोय. त्यामुळे आमच्या पडताळणीत पाण्यावरून श्वान धावत असल्याचा दावा असत्य ठरला.