मुंबई : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हीडिओ व्हायरल होत असतात. काही व्हीडिओ हे कॉमेडी तर काही व्हीडिओ हे हादरवणारे असतात. असाच एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हीडिओ पाहून तुम्हीही उडून जाल. कारण व्हीडिओच तसाच आहे. चक्क एक महिला वाघासोबत बोटीतून फिरताना दिसतेय. (fact check viral polkhol lady friendship with tiger)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही कधी वाघाला माणसांसोबत फिरताना पाहिले आहे का? पाहिलं नसेल तर आता पाहा. सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हीडीओ समोर आला आहे. या व्हीडीओमध्ये वाघासोबत एक महिला बोटीवर बसलेली दिसतेय. ही महिला या वाघासोबत बिनधास्त बसलीय. 



पुढे बसलेला वाघ पाण्याकडे पाहत आहे.  तर महिला हसत हसत बोट वळवताना दिसतेय. वाघाने एक पाय पाण्यात टाकलाय. तो या राइडचा आनंद घेतोय. हा वाघ पाळीव असल्याचं बोललं जातंय. तसेच हा व्हीडिओ कुठला आहे, याबाबत अजूनही काही माहिती समोर आलेली नाही.