मुंबई : आपल्यापैकी अनेक लोक शुभ आणि अशुभ गोष्टींना मानतात. ज्यामध्ये दिवस, अंक, ठिकाण याचा समावेश आहे. म्हणून तर कोणतीही जागा विकत घेताना आपण ती शुभ की अशुभ असे पाहून विकत घेतो. तसेच शुभ दिवशी आपण नवीन गोष्टींची किंवा कामांची सुरुवात करतो. असंच काहीसं संख्यांच्याबाबतीत होतं. असे सांगितले जाते की, असा एक फोननंबर आहे. जो एकेकाळी झपाटलेला नंबर म्हणून प्रसिद्ध होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जो कोणी हा झपाटलेला नंबर वापरत होते. ते सगळे लोक या जगाला सोडून गेले असल्याचे सांगितले जात आहे. ज्यामुळे आता या फोननंबरला बॅन केले गेले आहे. जो सध्या कोणीही वापरत नाही. 


सर्व भूत कथांमध्ये, तुम्ही बाहुली, घर किंवा माणसामध्ये आत्मा येत असल्याबद्दल ऐकले असेल, परंतु फोन नंबरमध्ये भूत कसे येऊ शकते? बल्गेरियामध्ये असा एक नंबर आहे, जो 10-15 वर्षे त्यांच्या नावावर वाटप केलेल्या लोकांच्या जीवावर बेतला आहे.


सलग 3 अशा घटनांनंतर, हा फोन नंबर स्वतःच पछाडलेला आणि खराब असल्याचे गृहित धरले गेले. सोशल मीडियावरही या संख्येच्या चर्चा रंगल्या आहेत.


फोननंबर वापरुन मृत्यू


हा फोन नंबर वापरणारी पहिली व्यक्ती होती - व्लादिमीर ग्रॅश्नोव्ह. ते मोबिटेल नावाच्या कंपनीचे सीईओ होते. फोन नंबर वापरल्यानंतर एक वर्षानंतर, वयाच्या 48 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्याच्या मृत्यूचे कारण कर्करोग असल्याचे सांगण्यात आले, परंतु प्रतिस्पर्ध्यांकडून त्याला किरणोत्सर्गी विष देण्यात आल्याचीही अफवा पसरली.


हा नंबर वापरणारा दुसरा व्यक्ती माफिया डीलर होता. डिमेट्रोव्ह असे त्याचे नाव आहे. त्याने हा फोन नंबर घेतल्यानंतर लगेचच त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर 2005 मध्ये बल्गेरियातील एका व्यावसायिकाने हा नंबर घेतला. नंबर वापरल्यानंतरच त्यांची हत्या ही करण्यात आली.


तो फोननंबर नक्की आहे तरी कोणता?


3-3 लोकांचा जीव घेणारा तो नंबर ऐकायला खूप व्हीआयपी आहे, कदाचित त्यामुळेच लोक त्याला अ‍ॅलॉट करायचे. हा क्रमांक होता - 0888888888. 2000 ते 2005 दरम्यान या फोननंबरमुळे 3 लोकांचा मृत्यू झाला.


परंतु कंपनीकडून याबद्दल कधीही कोणतीही प्रतिक्रिया आली नाही, परंतु 3 मृत्यूनंतर तो नंबर निलंबित करण्यात आला आहे. तेव्हापासून, हा अनोखा क्रमांक खराब मानला जात आहे आणि लोक सोशल मीडियावर वेळोवेळी त्याची चर्चा करत आहेत.


ही बातमी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. परंतु झी 24 तास या बातमीची खातरजमा करत नाही.