प्रसिद्ध मराठी कवी दिलीप चित्रे यांचे निधन
प्रसिद्ध मराठी कवी दिलीप वि. चित्रे यांचे अमेरिकेतील सन सिटी सेंटर फ्लोरिडा येथे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते.
वॉशिंग्टन : प्रसिद्ध मराठी कवी दिलीप वि. चित्रे यांचे अमेरिकेतील सन सिटी सेंटर फ्लोरिडा येथे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते.
'कुंपणापलिकडले शेत' हा दिलीप चित्रे आणि मुकुंद सोनपत्की या दोघांनी संपादित केलेला भारताबाहेर राहणार्या लेखकांनी लिहिलेल्या कथांचा संग्रह खूप गाजला. विविध देशांतील जीवनाची झलक असलेल्या कथा त्या संग्रहात होत्या.
'हिमगंध' हा त्यांचा एका अमेरिकावासी कवीचा पहिला काव्यसंग्रह तर 'अलिबाबाची हीच गुहा' या नाटकात अमेरिकेतील भारतीय पहिल्या पिढीचे वेगवेगळे अनुभव संगीत नाटकाच्या माध्यमातून प्रकटलेले होते. हे नाटक पहिल्या 'जागतिक मराठी परिषदेत" अमेरिकेतल्या कलाकारांनी सादर केले होते.
पश्चिमा, महाराष्ट्र फाऊंडेशन अशा संस्थांतून त्यांनी भरीव सामाजिक कार्य केले. त्यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार राम फाट्क यांनी चाली दिल्या होत्या आणि 'स्वर हे पश्चिमरंगी' या शीर्षकाखाली त्या प्रकाशित झाल्या होत्या.
त्यांच्या मागे पत्नी शोभा, मुले रोहित आणि अमित, सूना, नातवंडे असा परिवार आहे.