मुंबई : सोशल मीडियाचा वापर गेल्या काही वर्षांमध्ये कमालीचा वाढला. बहुविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तितक्याच चित्रविचित्र पद्धतीचा कंटेंट पोस्ट केला जाऊ लागला. मुख्य म्हणजे हा कंटेंट पाहणाऱ्यांचीही संख्या तितकीच मोठी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अश्लील व्हिडीओंपासून ते फोटोंपर्यंत बरीच माहिती काही प्रसिद्ध अॅपवर शेअर केली जाते. ही माहिती फक्त खळबळजनक नसून, अनेकांनाच हादरवणारी आहे. 


सोशल मीडियावर महिलांनी पोस्ट केलेले त्यांचे फोटो परवानगीशिवाय शेअर केले जाणारं हे अॅप आहे, टेलिग्राम. 


अनेक महिने करण्यात आलेल्या निरीक्षणानंतर ही बाब समोर आली. जिथं, जवळपास 20 देशांमध्ये मोठे ग्रुप आणि वाहिन्यांवर महिलांचे फोटो आणि व्हिड़ीओ त्यांना कल्पना नसतानाच शेअर होत आहेत. महिलांना कल्पना नसताना चुकीच्या मार्गाने हे फोटो शेअर केले जात आहेत. 


क्य़ुबातील एका महिलेच्या आईला व्हिडीओ पाठवण्यात आला होता. ज्यामध्ये ती महिला होती. आपल्या मुलीला या अवस्थेत पाहून आईला पुरता हादरा बसला होता. 


बरं, या व्हिडीओमध्ये महिलेचा पतीसुद्धा दिसत होता. पण, त्याचा चेहरा मात्र ब्लर करण्यात आला होता. तिचा चेहरा मात्र स्पष्ट दिसत होता. 40 हजार ग्रुपमध्ये हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. 


आपल्या पतीनेच हे केलं असल्याचं त्या महिलेचं मत. दरम्यान, त्यांच्या नात्यात अखेर दुरावा यायचा तो आलाच. 


महिलांचे न्यूड फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करण्यासोबतच यामध्ये त्यांचा पत्ता, आई- वडिलांचे फोन नंबर अशीही माहिती दिली जाते. टेलिग्रामच्या सांगण्यानुसार जगभरात त्यांचे 50 कोटींहून अधिक युजर्स आहेत. 


ट्विटरहूनही अधिक युजर्स असणाऱ्या या अॅपशी ही लोकं सिक्रेट प्लॅटफॉर्म म्हणून जोडले गेले आहेत. 


गेल्या वर्षी व्हॉट्सअपनं गोपनीयता धोरणात बदल केल्यानंतर अनेकांनीच टेलिग्रामचा वापर वाढला. यामध्ये मोठ्या प्रमाणात ग्रुप सक्रिय असून, त्यांच असे फोटो आणि व्हिडीओ शेअर होत आहेत. 


टेलिग्रामवर कमालीची गोपनीयता पाळ्यात येत आहे. इथं, तुम्ही कोणा व्यक्तीशी संवाद साधत असल्यास तिसऱ्या व्यक्तीला, कंपनीलाही या संभाषणाची कल्पना नसते. 


शिवाय या कंपनीचे मालक, युजर्सना सेन्सॉर करु इच्छित नाहीत. ज्यामुळं न्यूड फोटो लीक करण्यासाठी सध्या इथं अनेकांचं फोफावत आहे. 


टेलिग्रामवर खासगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही ग्रुप आणि चॅनलमध्ये इन अॅप रिपोर्टींग सुविधा आहे, जिथं युजर्स पॉर्नोग्राफी रिपोर्ट करु शकतात. 


अनेक नियम, अनेक अटी अस्तित्वात असूनही तूर्तास नग्न फोटो हटवणं ही मात्र टेलिग्रामची प्राथमिकता दिसत नाही.