वॉशिंग्टन : लॉटरी कंपनीने (Lottery) 2 महिन्यांपूर्वी तिकीट खरेदी करणाऱ्या संबंधितांनी तब्बल 10 हजार कोटी जिंकले आहेत. मात्र 2 महिने उलटून गेले. त्यानंतरही कुणीही आम्ही जिंकलोय, असा दावा करायला कुणीच आलं नाही. आता 2 तरुण गेले. आमच्याकडे ते तिकीट आहे. आम्हालाच विजयी रक्कम मिळायला हवी, अशी या तरुणांची मागणी आहे. अमेरिकेच्या इलिनोइस लॉटरी कंपनीने (Illinois Lottery) विजेत्यांनी येऊन दावा करावा असं सांगितलं होतं. (finally 2 people claim for  100 billion ruppes lottery at america)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉटरी विजेत्यांनी आपली ओळख गोपनिय ठेवण्याचा निर्णय घेतलाय. "या दोन्ही तरुणांनी विजयी राशीचं काय करायचं हे ते ठरवु शकतात", असं लॉटरी कंपनी मालक हेरोल्ड माय्स यांनी स्पष्ट केलं.


विशेष म्हणजे 29 जुलैला विजयी ठरलेल्यांची नावं जाहीर केली होती. हे विजयी तिकीट शिकागो जवळील डेस प्लेन्सयेथील एका स्टोरमधून खरेदी केलं होतं.


मात्र अनेक दिवस उलटून गेले. त्यानंतरही आम्ही जिंकलोय असं कुणीच दावा करायला आलं नाही. त्यामुळे चिंता वाढू लागली. विजयी रक्कमेवर दावा करण्यासाठी 60 दिवसांची मुदत असते. "आम्ही विजयी रक्कमेवर दावा करण्यासाठी कायदेशीर सल्ला घेतला. त्यामुळे इतका वेळ लागला", असा दावा केला जात आहे.


एकदाच 63 अरब इतकी रक्कम घेऊ, असं या दोन्ही विजेत्यांनी ठरवलंय. मात्र या तरुणांनी विजयी रक्कम हफत्यात घेतली, तर यांना 10 हजार कोटी रुपये मिळाले असते.  


"विजेत्यांबाबत कोणतीही माहिती नाही. मात्र ते दोघे जे कोणी असतील फार उत्सूक असतील", असं लॉटरी कंपनीचे व्यवस्थापकांनी म्हटलं.  


"इतकी मोठी रक्कम एकरकमी देण्याची भावना फार वेगळीच असते. यामुळे विजेत्यांच्या आयुष्यात मोठा बदल होणार,हे माहित असताना", अंस कंपनीने सांगितलं.