अमेरिका : एलियन्सबद्दल अनेक प्रकारचे दावे केले जातात. काही लोकांनी यूएफओ आणि एलियन पाहिल्याचा दावा केला आहे. अनेक वेळा गुगल अर्थवर एलियन्सशी संबंधित अनेक गोष्टी पाहण्याचे दावे करण्यात आले आहेत. मात्र, हे एलियन्स कुठे राहतात आणि कोणत्या मार्गाने येतात आणि जातात, असे प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंत, शास्त्रज्ञ देखील याबद्दल काही माहिती मिळवू शकले नाहीत नाहीत. दुसरीकडे, गुगलवर एका व्यक्तीने  रहस्यमय दरवाजा सापडल्याचा दावा केला आहे. यानंतर लोकांनी याला एलियन्सच्या जगाचा गुप्त दरवाजा म्हटलंय.


गुगल अर्थवर अनेक वेळा विचित्र गोष्टी पाहिल्याचा दावा करण्यात आला आहे. यात जिओसिंक्रोनस ऑर्बिटमधील उपग्रहांकडून घेतलेले फोटो, पृथ्वीजवळचे उपग्रह, विमानं आणि ड्रोन यांचाही समावेश आहे. जिओसिंक्रोनस ऑर्बिटमधील उपग्रह पृथ्वीपासून हजारो किमी अंतरावरून फोटो घेऊ शकतात. 


गुगल अर्थच्या छायाचित्रांच्या मदतीने जगातील रहस्यमय ठिकाणांचीही माहिती मिळाली आहे. त्याच्या मदतीने अंटार्क्टिकामध्ये एक रहस्यमय दरवाजा सापडल्याचा दावा एका व्यक्तीने केलाय.


पर्वतांच्यामध्ये दिसला रस्ता


हा दरवाजा अंटार्क्टिकामधील बर्फाच्या मधोमध असल्याचा दावा फोटो काढणाऱ्या व्यक्तीने केला आहे. तसंच, यूट्यूबवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये हा दरवाजा स्पष्टपणे दिसत होता. व्हिडिओमध्ये बर्फ आणि खडकांमध्ये गुहेचा दरवाजा दिसत होता. व्हिडिओ पाहिल्यानंतर, अनेकांनी सांगितलं की हे एलियन्सच्या जगाच्या गुप्त मार्गाचे द्वार असू शकतो. 


युएफओ पाहिल्याचाही दावा


गुगल अर्थवर एलियन आणि यूएफओशी संबंधित पुरावं पाहिल्याचा दावा अनेकदा करण्यात आला आहे. त्याच वेळी, अमेरिकेने देखील कबूल केलंय की, 17 वर्षांत पृथ्वीवर सुमारे 144 यूएफओ दिसले आहेत. भारतातही UFO दिसल्याचा दावा करण्यात आला होता. 


यूएफओची चौकशी करण्यासाठी अमेरिकेने एक टास्क फोर्स देखील तयार केला आहे. यूएस टास्क फोर्सच्या अहवालानुसार, 2004 ते 2021 दरम्यान, 144 यूएफओ पाहिल्या गेल्या आहेत.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)