शरीरातील घाम मॉडेलला नकोसा, ऑपरेशननंतर घडला धक्कादायक प्रकार
शरीरातील घामाला कंटाळून मॉडेलने केलं ऑपरेशन
मुंबई : शरीरातून निघणारा घाम हा कायमच त्रासदायक असतो. या घामावर उपाय म्हमून एका मॉडेलने चक्क ऑपरेशनचा घाट घातला. पण लोकप्रिय मॅक्सिकन फिटनेस इनफ्लूएंसर आणि बॉडी बिल्डर ओडालिस सैंटोस मेना (Odalis Santos Mena) यांना ऑपरेशन करणं पडलं भारी. ऑपरेशन करणं महिलेच्या जीवावर बेतलं. (Fitness Model Odalis Santos Mena died after undergoing a controversial medical procedure )
इंस्टाग्रामवर 1.47 लाख फॉलोअर्स
ओडालिस सैंटोस मेना सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म इंस्टाग्रावर अतिशय लोकप्रिय आहे. यावेळी तिचे तब्बल 1 लाख 47 हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत. मेना कायमच सोशल मीडियावर आपल्या फिटनेसचे फोटो शेअर करत अशते. मात्र आज तिच्या निधनाची बातमी समोर आली आणि सगळे स्तब्धच झाले.
द सन च्या रिपोर्टनुसार, ग्वाडलजारामध्ये स्किनपील क्लिनीकद्वारे मिराड्राई (Mira Dy) नावाच्या एका एंटीपर्सपिरेंट उपचाराला प्रोत्साहन देण्याकरता दाखल झाली होती. जेथे तिचं ऑपरेशन करण्यात आलं होतं. ऑपरेशन यशस्वी झाल्याने सगळं व्यवस्थित होतं.
ऑपरेशननंतर हृदयविकाराचा झटका
संशोधनात समोर आलं की,'या प्रक्रियेत घाम येणाऱ्या ग्रंथीयांवर ऊष्णतेच्या माध्यमातून ऑपरेशन करण्यात आलं. यानंतर मॉडेलच्या अंडरआर्ममध्ये घाम येणं बंद झालं. असंच काहीसं मेनासोबत झालं. ज्यानंतर तिच्या शरीरातून येणारा घाम आणि त्याचा दुर्गंध कमी झाला.'
मात्र या ऑपरेशननंतर एनेस्थेटिझी झाल्यावर तिला हृदयविकाराचा झटका आला. फिटनेस मॉडेल मेनचा लवकरच मृत्यू झाला. या वेळी क्लिनिकच्या कर्मचार्यांनी सीपीआरमार्फत मॉडेलला श्वास देण्याचा प्रयत्न केला, परंतु तिला वाचवता आले नाही. कधीच घाम येणार नाही याकरता उपचार सुरक्षित आणि प्रभावी आहेत. या आश्वासनासह मेनाकडून कथित अँटीपर्सपिरंटची जाहिरात केली गेली.