बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्यावर मोठा दहशतवादी हल्ला, इतके सैनिक ठार
पाकिस्तानच्या (Pakistan) बलुचिस्तान (Balochistan) प्रांतात मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्यात आला आहे. (Balochistan Terrorist Attack)
कराची : पाकिस्तानच्या (Pakistan) बलुचिस्तान (Balochistan) प्रांतात मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्यात आला आहे. (Balochistan Terrorist Attack) बलुचिस्तान प्रांतातील दोन वेगवेगळ्या भागात संशयित अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी लष्कराचे कमीतकमी पाच जवानांचा (Pakistani soldiers) मृत्यू झाला आहे. तर अन्य दोन जखमी झाले आहेत. ( Five Pakistani Soldiers Killed by Terrorists in Balochistan Province)
दहशतवाद्यांच्या निशाण्यावर सैनिक
दहशतवाद्यांनी फ्रंटियर कोरच्या जवानांना लक्ष्य केले आहे. बलुचिस्तानची राजधानी क्वेटाच्या सीमेवर आणि कोहलू जिल्ह्याच्या दुर्गम भागात गुरुवारी फ्रंटियर कोरच्या सैनिकांवर हा हल्ला करण्यात आला. त्यानंतर दहशतवाद्यांनी पाकिस्तानच्या सैनिकांवर अंदाधुंद गोळीबार केला.
सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, पहिला हल्ला क्वेटा बाहेरील बायपास भागात झाला. ते म्हणाले की, येथे मोटारसायकलमध्ये रिमोट चालवणारे बॉम्ब ठेवून फ्रंटियर कोरच्या ताफ्याला टार्गेट करण्यात आले होते, त्यात एक सैनिक ठार तर दोन जण जखमी झाले. सुरक्षा अधिकारी म्हणाला, गस्त घालणाऱ्या फ्रंटियर कोरच्या वाहनाजवळ हा स्फोट झाला.
गोळीबाराला सैनिकांचे प्रत्युत्तर
कोहलू जिल्ह्यातील कहाण भागात हा दुसरा हल्ला गुरुवारी रात्री उशिरा करण्यात आला. या झालेल्या हल्यात संशयित अतिरेक्यांनी फ्रंटियर कोरच्या चौकीवर लक्ष्य करून चार सैनिकांना ठार मारल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ते म्हणाले, सशस्त्र हल्लेखोरांनी चेक पोस्टवर अंदाधुंद गोळीबार केला, याला सैनिकांनीही प्रत्युत्तर दिले.
दरम्यान, चीन-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडॉरचे (सीपीईसी) केंद्र, बलुचिस्तानमध्ये आहे. या कॉरिडॉरला दहशतवाद्यांचा विरोध आहे. त्यामुळे दहशतवादी आणि फुटीरतावादी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. अलिकडच्या काळात सुरक्षा दलांवरील हल्ले वाढले आहेत. १ फेब्रुवारी रोजी कच्छच्या दुर्गम भागात असलेल्या फ्रंटियर कोरच्या एका चौकीलाही लक्ष्य करण्यात आले होते. ज्यात एक सैनिक ठार झाला आणि दुसरा जखमी झाला.