नेदरलॅंड : महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त देशा परदेशात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताप्रमाणे नेदरलॅंडमधील हेग येथे 'आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन' साजरा केला. 'फॉलो द महात्मा' आणि 'गांधी मार्च' या दोन अभियानांचाही यामध्ये समावेश करण्यात आला होता.  


हेग मधील कार्यक्रमात अभिनेता मिलिंद सोमण,  भारताचे राजदूत वेणू राजामोनी सह अन्य अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला होता. 




'फॉलो द महात्मा' या कार्यक्रमामध्ये सुमारे ८०० लोकांनी सहभाग घेतला होता. भारतीय वेशभूषेमध्ये अनेकांनी यामध्ये सहभाग घेतला होता. तसेच ढोल ताशांच्या जल्लोषात गांधी जयंती साजरी करण्यात आली.  
'Gandhi-an illustrated biography' या पुस्तकाचेदेखील यावेळेस अनावरण करण्यात आले. अहिंसेला पाठिंबा देणारे  बॅनर्स यावेळी झळकवले. तसेच या कार्यक्रमाची सांगता एका संगीत कार्यक्रमाने झाली.