Abby Choi Murder: दिल्लीमधील श्रद्धा वालकर मर्डर केसची (Shraddha Walker Murder Case) आठवण करुन देणारा धक्कादायक प्रकार हाँग-काँगमध्ये (Hong Kong) समोर आला आहे. येथील एबी चोई (Abby Choi) नावाच्या मॉडलची हत्या करण्यात आली आहे. एबी चोईच्या मृतदेहाचे (Abby Choi Dead Body) तुकडे फ्रिजमध्ये आढळून आले आहेत. एबी चोईच्या शरीराचे अनेक तुकडे करण्यात आले असून बरेचसे तुकडे अजूनही पोलिसांना सापडलेले नाहीत. पोलीस सध्या एबीच्या मृतदेहाच्या उर्वरित तुकड्यांचा शोध घेत आहे. एबी चोईचे काही कपडेही पोलिसांना सापडले आहेत. एबी चोईची हत्या तिचा पूर्वाश्रमीचा पती अॅलेक्स क्वोंग कांग ची याने केल्याची शंका उपस्थित केली जात आहे. पोलिसांनी अॅलेक्सला अटक केली आहे. सध्या पोलीस अॅलेक्सची चौकशी करत आहे.


इलेक्ट्रिक कटर वापरलं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एबीच्या हत्येप्रकरणी अॅलेक्सचे आई-वडील आणि भावाचाही आरोपी म्हणून आरोपपत्रात उल्लेख करण्यात आळा आहे. मुख्य आरोपी असल्याचा दावा केला जात असलेल्या अॅलेक्सने एबी चोईचा मृतदेह इलेक्ट्रिक कटर आणि मीट स्लाइसर म्हणजेच मांस कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सुरीने कापल्याची शक्यता पोलीस तपासून पाहत आहेत. एबी चोईसारख्या प्रसिद्ध मॉडेलची अशी निर्दयीपणे हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.


22 तारखेपासून होती बेपत्ता


22 फेब्रुवारीपासून 28 वर्षीय एबी चोई बेपत्ता होती. त्यानंतर 24 तारखेला पोलिसांनी तिच्या घराची झडती घेतली. त्यावेळी तिच्या घरातील फ्रिजमध्ये एका मनवी मृतदेहाचे तुकडे आढळून आले. तुकडे करुन ठेवलेले पायाचे भाग फ्रिजमध्ये सापडले. यानंतर हाँगकाँग पोलिसांनी एबी चोईच्या पूर्वाश्रमीच्या पतीला म्हणजेच अॅलेक्सला अटक केली. या प्रकरणाचा कसून तपास केला जात आहे. एकीकडे आरोपीची चौकशी सुरु असतानाच दुसरीकडे एबीच्या मृतदेहाचे उर्वरित तुकडे कुठे आहेत याचा शोध घेतला जात आहे.


घर सील करण्यात आलं


हाँगकाँग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एबी चोईच्या पूर्वाश्रमीच्या पतीबरोबरच सासू-सासरे आणि दिरालाही अटक करण्यात आली आहे. शहरापासून काही अंतरावर असलेल्या एबी चोईचं घर सील करण्यात आलं आहे. या घरातील प्रत्येक गोष्ट पोलीस तपासून पाहत आहेत. याच ठिकाणी एबीच्या मृतदेहाचे काही तुकडे सापडले आहेत. या घरामध्ये ओळखपत्र, क्रेडिट कार्डही सापडले आहेत.


भिंती कापडाने झाकल्या...


एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ही पूर्वनियोजित हत्या आहे. आम्ही एबी चोईच्या घरात पोहोचल्यानंतर लगेचच आम्हाला कळून चुकलं की इथे काहीतरी घडलं आहे. फार जाणीवपूर्वक पद्धतीने हत्या करण्याआधी घरातील भिंतींवर कापड टाकून त्या झाकण्यात आल्या. रक्ताचे डाग भिंतीवर उडू नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली होती. आम्हाला मांसांचे काही तुकडे घरातील भांड्यांमध्येही आढळून आल्याचं या अधिकाऱ्याने सांगितलं.