Pakistan Former Army Chief: मागील महिन्यात निवृत्त झालेले पाकिस्तानचे(Pakistan) माजी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा (General Qamar Javed Bajwa) आणि आयएसआयचे माजी चिफ जनरल फैज हमीद (ISI Chief General Faiz Hameed) यांच्यावर पाकिस्तानी अभिनेत्रींसोबत शरीर संबंध ठेवल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. या आरोपामुळे  पाकिस्तानची फिल्म इंडस्ट्री आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.  लंडनमध्ये राहणारे पाकिस्तानचे माजी लष्करी अधिकारी आदिल राजा (Major Adil Raja) यांनी हा गंभीर आरोप केला आहे . हे सर्व प्रकरण सुरु असतानाच इम्रान खान स्वत:ला Playboy म्हणाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जनरल कमर जावेद बाजवा आणि  आयएसआयचे माजी चिफ जनरल फैज हमीद हे राजकीय  नेत्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी पाकिस्तानी अभिनेत्रींचा वापर करत होते.  या पाकिस्तानी अभिनेत्रींना गुप्तचर संस्थेच्या मुख्यालयात बोलावून त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवत असल्याचा दावा माजी लष्करी अधिकारी आदिल राजा यांनी केला आहे. 
माजी लष्करी अधिकारी आदिल राजा यांचे एक स्वतंत्र Youtube चॅनेल आहे. या Youtube चॅनेवरुनच त्यांनी हा अत्यंत खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. याचा व्हिडिओ त्यांनी ट्विटर देखील शेअर केला आहे. 


या खळबळजनक दाव्यानंतर  आदिल राजा यांचा व्हिडीओ मेहविश हयाद (MH), माहिरा खान (MK), कुब्ब्रा खान (KK) आणि सजल अली (SA) या अभिनेत्रींच्या फोटोंसह तुफान व्हायरल होत आहे. चौफर टीका सुरु झाल्यानंतर आदिल राजा यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला आहे. मी कुणाचे ही नाव घेतले नाही MH, MK, KK आणि SA अशा नावांचा उल्लेख केला आहे. अशा नावांच्या अनेक अभिनेत्री आणि मॉडेल्स असल्याचे आदिल राजा म्हणाले. आदिल राजा यांच्या व्हिडिओत नाव असेलल्या अभिनेत्रीच्या चात्यांनी त्यांना मानहानीचा खटला दाखल करण्याचा सल्ला दिला आहे. 


कथित ऑडिओ-व्हिडिओ क्लिपवरुन इम्रान खान आणि बाजवा यांच्यात आरोप प्रत्यारोप


पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे देखील कथित ऑडियो आणि व्हिडिओ क्लिपमुळे अडचणीत आले आहेत. इम्रान खान यांनी माजी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्यावर पाठीत वार केल्याचा आरोप केला आहे. तसेच जनरल बाजवा यांनी एका बैठकीत त्यांना प्लेबॉय म्हटले होते असा दावा देखील त्यांनी केला आहे. होय मी  प्लेबॉय आहे असे म्हणत इम्रान खान यांनी हल्ला बोल केला आहे.