`शाळेत मोबाईल नेण्यास लवकरच बंदी`
शाळांमध्ये मोबाईल न्यायला बंदी घालण्यात येणार आहे.
पॅरीस : फ्रान्समध्ये लवकरच शाळांमध्ये मोबाईल न्यायला बंदी घालण्यात येणार आहे. त्यासाठी फ्रान्स सरकार लवकरच एक विधेयक आणणार आहे. मोबाईलमुळे वर्गात येणारे अडथळे आणि खोड्या थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. डिटॉक्स मेजर असं याला नाव देण्यात आलंय. फ्रान्समध्ये सप्टेंबरमध्ये शालेय वर्षाला सुरुवात होते. यंदाच्या वर्षापासून ही मोबाईल बंदी लागू होणार आहे. फ्रान्समध्ये शाळेत जाणाऱ्या १२ वर्षांच्या पुढच्या नव्वद टक्के मुलांकडे मोबाईल असतो.
फ्रान्सचे शिक्षण मंत्री जीन मिशेल ब्लॅनकर यांनी सांगितले की, ही योजना सप्टेंबर २०१८ मध्ये आमलात आणण्याचा विचार आहे. पुढील शालेय वर्षाच्या सुरुवातीपासून लागू होईल. सहाव्या वर्षांपासून ते १५ वयोगटातील मुलांसाठी सर्व शाळांना हा नियम लागू होईल.