मुंबई : PNB Bank पंजाब नॅशनल बँकेचे 13500 कोटी रुपये कर्ज (Punjab National Bank scam)बुडवून फरार झालेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी (Mehul Choksi) याला अटक करण्यात आली आहे. बार्बुडातून आणि अँटिग्वा येतून मेहुल चोक्सी संदर्भात महत्त्वाची माहिती हाती आली आहे. काही दिवसांपूर्वी अँटिग्वा फरार झालेल्या चोक्सीला अटक करण्यात यश मिळाले आहे. मेहुल चोक्सी याला डोमिनिकामध्ये अटक करण्यात आली आहे. चोक्सीची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (Criminal Investigation Department- CID) कारवाई करत त्याला ताब्यात घेतले आहे. त्याला कधीही भारतात आणणे जाईल,अशी शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

PNB Bankची मोठी फसवणूक करुन मेहुल चोक्सी (Mehul Choksi) भारतातून फरार झाला होता. त्याला परत आणण्यासाठी भारताकडून प्रयत्न सुरु होते. त्यातच बार्बुडानंतर 23 मे रोजी चोक्सी अँटिग्वातून फरार झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर त्याचा शोध घेतला जात होता. जानेवारी 2018 पासून तो तेथे राहत होता, अशी माहिती कॅरेबियन बेटावरील रॉयल पोलीस दलाने दिली होती. (Fugitive diamantaire Mehul Choksi is in the custody of the Criminal Investigation Department  in Dominica)



दरम्यान, Mehul Choksi फरार झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनीही बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. दरम्यान, चोक्सी डोमिनिकामध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सीआयडीने कारवाई करत त्याला अटक केली. सध्या तो सीआयडीच्या कोठडीत आहे.


मेहुल चोक्सी ( Mehul Choksi) याला अटक झाल्यानंतर त्याचे वकील विजय अग्रवाल यांनीही याबद्दलची माहिती दिली. ते म्हणाले,  मी त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्के केला आहे. मेहुल चोक्सी सापडल्याची माहिती दिली. याची माहिती मिळाल्याने त्यांचे कुटुंबीय आनंदात आहेत. तसेच त्यांच्या ठिकाणाची माहिती मिळाल्यामुळे त्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. डोमिनिकामध्ये कसे घेऊन जाण्यात आले, याची माहिती घेण्यासाठी चोक्सीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला जात आहे.