नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी जी २० देशांच्या शिखर परिषदेसाठी जपानमधील ओसाका येथे आज दाखल झाले आहेत. यावेळी जपानमधील भारतीयांनी मोदी यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. सकाळी साडे दहा वाजता मोदी आणि जपानचे राष्ट्राध्यक्ष शिंजो आबे यांची भेट होणार आहे. जी २० शिखर परिषद ही जपानला होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जी २० शिखर परिषद आजपासून पुढील दोन दिवस म्हणजेच २९ जूनपर्यंत चालणार आहे. या परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी फ्रान्स, जपान, इंडोनेशिया, अमेरिका आणि तुर्कस्थान या देशातील प्रमुखांसह द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. त्याचसोबत ब्रिक्स राष्ट्रांच्या नेत्यांसह देखील या परिषदेत बैठक होणार आहे. 



दरम्यान दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांची भेट होणार आहे. त्यामुळे याभेटीकडे साऱ्यांचच विशेष लक्ष राहाणार आहे. दरम्यान या शिखर परिषदेत दशतवाद आणि जागतीक हवामान बदल या समस्यांबाबत कशा प्रकारे सामना करता येईल यबाबत चर्चा करण्यार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.