मुंबई : भारताप्रमाणेच जगातील अनेक देशांमध्ये अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. अनेक देशांमध्ये पुन्हा पुन्हा लॉकडाऊन लावण्याची नामुष्की ओढावतेय. अमेरिका, भारतानंतर युरोपातील देशांमध्ये सर्वाधिक कोरोनाचा संसर्ग झाल्याचं दिसते आहे. त्यामुळेच फ्रान्सपाठोपाठ आता जर्मनीतही पुन्हा लॉकडाऊनची ( Lockdown ) घोषणा केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वीच फ्रान्सने महिन्याभराच्या लॉकडाऊनची ( France lockdown ) घोषणा केलेली, त्यानंतर आता जर्मनीनेही ५ दिवसांचा ( Germany lockdown ) कठोर लॉकडाऊन लावण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. १ एप्रिल ते ५ एप्रिल लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. मात्र या ५ दिवसात केवळ एक दिवसच म्हणजेच ३ एप्रिलला अन्न-धान्याची दुकानं खुली राहतील. याशिवाय ईस्टर ( Easter ) आणि गूड फ्रायडेमुळेही ( Good Friday ) अधिकाधिक निर्बंध कडक करण्यात आले आहेत. 


जर्मनीत ५ दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये काय नियम?


१. चर्चमध्ये होणारे कार्यक्रमांचं ऑनलाईन प्रक्षेपण करण्यात यावं 
२. एका घरातील लोकांना दुसऱ्या घरातील लोकांना भेटायचं असेल, तर ५ जणांपेक्षा जास्त लोकांना भेटता येणार   नाही. 
३. कोरोना चाचण्या आणि लसीकरण केंद्र सुरू राहणार
४. कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी नाही
५. पाच दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये सर्व दुकाने बंद राहतील. ३ एप्रिललाच फक्त किराणा दुकाने उघडायला 
  अनुमती
६. जर्मनीमध्ये येणाऱ्या लोकांना कोरोना टेस्ट बंधनकारक 


जर्मनीमध्ये कोरोनाची ( Germany Corona ) रुग्णसंख्या वेगाने वाढू लागली आहे. त्यामुळेच निरनिराळ्या प्रांतातील १६ नेत्यांसोबत बैठक घेऊन जर्मनीच्या चान्सरल अँजेला मार्केल यांनी ५ दिवसांच्या लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे.