मुंबई : लग्न प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा असतो. काही जण हे आपली आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने लग्नासाठी  कर्ज काढतात. पण एक असा देश आहे जो लग्न केल्यानंतर तुम्हाला २५ लाखांचे कर्ज  देणार आहे. हे बिनव्याजी कर्ज  असणार आहे. विशेष म्हणजे तुम्ही तीन अपत्यांना जन्म दिल्यास २५ लाखांचे कर्ज माफ देखील करण्यात येणार आहे. कर्ज मिळवण्यासाठी अनेकदा बँकांचे उंबरे झिजवावे लागतात. पण हा देश सहजासहजी कर्ज देत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युरोपमधील हंगेरी या देशाने ही भन्नाट ऑफर देऊ केली आहे. हंगरी या देशाची लोकसंख्या इतर देशांच्या तुलनेत फारच अल्प आहे. तसेच या देशात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्याही दिवसेंदिवस घटत चालली आहे. आपल्या देशाची लोकसंख्या वाढावी या उद्देशाने  हंगेरीचे पंतप्रधान विक्टर ऑर्बन यांनी महिलांसाठी ही विशेष योजना सुरु केली आहे. त्यानुसार, ४० पेक्षा कमी वय असलेल्या महिलांना लग्न करताना २५ लाखांचे बिनव्याजी कर्ज दिले जाणार. तसेच जर तिसऱ्या अपत्याला जन्म दिल्यास २५ लाखांचे कर्ज पूर्णपणे माफ केले जाणार आहे. 


चौथ्या अपत्याला जन्म दिल्यास करमुक्त


संबंधित महिलेने ४ किंवा त्यापेक्षा जास्त अपत्यांना जन्म दिल्यास त्यांना आजीवन प्राप्तीकरापासून मुक्तता मिळेल. तसेच तीन किंवा त्यापेक्षा जास्त अपत्य असलेल्या कुटुंबाला ७ आसनी गाडी खरेदी करण्यासाठी ६ लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. हंगेरीचे भविष्य अबाधित ठेवण्यासाठी हा निर्णय सरकारने घेतला आहे.


'स्टेट ऑफ द नेशन'ला संबोधित करताना हंगेरीचे पंतप्रधान  म्हणाले की,  मुस्लिम देशातील नागरिकांना आपल्या देशात प्रवेश देण्यापेक्षा आपल्या देशाची लोकसंख्या वाढवणे योग्य ठरेल. ते म्हणाले की, दुसऱ्या देशातील लोकांनी आपल्या देशात यावे, अशी माझी इच्छा नाही. त्यांना आपल्या देशात प्रतिबंध घालायला हवेत. तसेच आपली लोकसंख्या वाढवायला हवी.


लोकसंख्येत घट 


हंगेरी देशाची वर्तमान काळातील लोकसंख्या ही ९७. ८ लाख इतकी आहे.