Trending News : प्रेम हे आयुष्यातील सर्वात सुंदर नातं असतं. प्रियकर प्रेयसी जेव्हा लग्नबंधनात बांधले जातात ते त्यांचा आयुष्यातील सगळ्यात आनंदाचा क्षण असतो. पण या दोघांपैकी कोणी एकाने पण धोका दिला तर. अशावेळी साधारण प्रियकर किंवा प्रेयसी आत्महत्येचा प्रयत्न करतात. काही जण डिप्रेशनमध्ये जातात तर काही जण परिस्थितीशी जुळवून आयुष्यात पुढे जातात. अगदी तुम्ही अशा पण बातम्या ऐकल्या किंवा वाचल्या असतील की धोका दिल्यामुळे प्रियकराने प्रेयसीवर हल्ला केला. पण सोशल मीडियावर एक प्रेयसीची कहाणी तुफान व्हायरल होते आहे. कारण प्रियकराने धोका दिल्यावर प्रेयसीने ज्याच्याशी लग्नगाठ बांधली तो निघाला प्रियकराचा...जाणून घ्या तिचा प्रेमाची कहाणी.


कोणाचं काय तर कोणाचं काय...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेतील ऑगस्टा हबलने आपल्या प्रेमाची कहाणी सांगितली जी सोशल मीडियावर व्हायरल झाली. हबल तिच्या प्रियकरासोबत 2014 पासून सोबत होती. तेव्हा ती 21 वर्षांची होती आणि प्रियकर 30 वर्षांचा होता. त्याचं नातं त्यादिवसात एका स्वप्नासारखं होतं. तिचा प्रियकर एका परफेक्ट जेंटलमॅन होता. तो रोज माझ्यासाठी फूलं आणि गिफ्ट आणायचा. तो अनेक वेळा मला लग्नासाठी मागणी घ्यालायचा. त्यांचं हे रोमांटिक रिलेशनशिप 2 वर्ष खूप छान होतं. मात्र एकदिवशी तिला कळलं की प्रियकर धोखा देत आहे. त्यानंतर प्रियकराने चूक कबुली दिली आणि तिने त्याला दुसरा चान्स दिला.


काही महिन्यानंतर तो परत चीटिंग करताना पकडला गेला. म्हणून मी त्याचासोबत ब्रेकअप केला, असं हबल म्हणाली. त्यानंतर तिला एक्स-प्रियकराचे वडील आवडायला लागले. या तरुणीने चक्क प्रियकराच्या वडिलांशी लग्न केलं. नुकताच तिने त्यांचा लग्नाचा 5वा वाढदिवस साजरा केला. हबलने तिचा नात्याबद्दल सोशल मीडियावर सांगितल्यावर काही जणांनी तिला सपोर्ट केला आहे. तर एका यूजरने लिहिलं आहे की, Ohh wow.