मुंबई : बाळ आणि आई हे नाते शब्दात न सांगता येणारे. एका जीवाला ९ महिने आपल्या उदरात वाढवून त्याला जन्म दिल्यानंतर लाभणाऱ्या मातृत्वाची तुलना कशाचीच होऊ शकत नाही. त्यानंतर तिच्या वाढीचा प्रत्येक क्षण तिला आईपण जगण्याचा आनंद देतो. बाळाच्या चेहऱ्यावरील गोड हसूच मग आईचं जग बनतं आणि बाळ आपल्याशिवाय राहणार नाही ही कल्पना पार सुखावून टाकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र डायना हिच्या मुलीला जन्मापासूनच दिसत नसल्याने, ती हे जग किंवा आपल्याला पाहू शकत नाही हे दुःख तिने सहन केलंय. 'निकोली' असं त्या मुलीचं नाव असून तिला असलेल्या एका असाध्य आजरामुळे तिला जन्मापासूच दिसत नव्हते. ती दोन वर्षाची झाल्यानंतर तिच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया जवळपास तीन तास सुरु होती. परंतु, त्यानंतर देखील आपली मुलगी पाहू शकेल का, अशी घालमेल, चिंता तिच्या कुटुंबियांना सतावत होती. मात्र शस्त्रक्रियेनंतर निकोलीला दिसायला लागले. आता आपली मुलगी जग पाहू शकते, आपल्याला पाहू शकते, हा आनंदापुढे तिच्या आईला आभाळ ठेंगणं झालं आहे. 


निकोलीने मला पहिल्यांदा पाहिले तो क्षण माझ्यासाठी खऱ्या अर्थाने अतिशय आनंदाचा क्षण होता, असे डायनाने म्हटले आहे. मात्र या आनंदात तिच्या


आणि डायनाने आपल्या भावना फेसबुकच्या पेजवरुन व्यक्त केल्या. तिने शेअर कलेल्या पोस्टला फेसबुकवर असंख्य प्रतिक्रीया मिळाल्या आहेत. यातून आई आणि बाळाचे नाते किती सुंदर, भावुक आणि हळवे असते, हे दिसून येते.