बिजिंग: तुम्ही जवळच्या व्यक्तीला सरप्राईज द्यायचा प्लॅन असेल तर थांबा आधी ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण तब्बल 2400 किमी प्रवास करून आपल्या खास व्यक्तीला सरप्राईज देण्यासाठी आलेल्या तरुणाला मोठा धक्का बसला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका व्यक्तीनं आपल्या गर्लफ्रेंडसाठी सरप्राईज प्लॅन केला. त्यासाठी तो 2400 किमी अंतर पार करून आला खरा. पण त्याने जे पाहिलं त्यानंतर त्याला खूप मोठा धक्का बसला आणि तो रागाने लालबुंद झाला. 


सरप्राईज देण्यासाठी तरुणाने टेडी बियरचा सूट घातला होता. गर्लफ्रेंडला बर्थडे सरप्राईज देण्यासाठी तो आला खरा. मात्र त्यावेळी गर्लफ्रेंड आपल्याच धुंदीत दुसऱ्या मुलासोबत फिरताना दिसली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. 


गर्लफ्रेंडनं प्लॅन केला चौपट
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की टेडीबियरचा सूट घालून एक तरुण आपल्या गर्लफ्रेंडजवळ पोहोचला. मात्र त्यावेळी गर्लफ्रेंड दुसऱ्या मुलासोबत होती. त्या मुलाने तिच्या गळ्यात हात टाकला होता. दोघंही एका दुकानाबाहेर उभे होते. 


हा सगळा प्रकार पाहून तरुणाचं मन खूप दुखावलं. त्याने आपला चेहरा गर्लफ्रेंडला दाखवला आणि तो तिथून निघून गेला. गर्लफ्रेंड त्याला मनवण्यासाठी अनेक तऱ्हेनं प्रयत्न करू लागली. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. 



हा व्हिडीओ  A channel you should subscribe to या युट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पुन्हा चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ जुना असून सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत असल्याची माहिती मिळाली आहे. हा व्हिडीओ चीनमधील असल्याची चर्चा आहे. 


सूचना : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. झी 24 तास या व्हिडीओची पुष्टी करत नाही.