सगळी तयारी झाली! गर्लफ्रेंडला अंगठी देऊन प्रपोज करणार तेवढ्या.... पाहा व्हिडीओ
गर्लफ्रेंडला प्रपोज करायला हटके जागा निवडली, पण धक्कादायक घटना घडली, पाहा व्हिडीओ
नवी दिल्ली : प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की आपल्याला मुलाने खूपच हटके ठिकाणी आणि खास प्रपोज करावं. हेच स्वप्न पूर्ण करायला तरुणानं तयारी केली खरी मात्र एक मोठा घोळ झाला. त्यामुळे गर्लफ्रेंड नाराज झाली.
सगळी तयारी झाली. धबधब्याजवळ सुंदर अशी जागाही निवडली जिथे गर्लफ्रेंडला प्रपोज करता येईल. मात्र त्याच वेळी तरुणाच्या हातून रिंग दरीतून खाली कोसळते. गर्लफ्रेंडचा मोठा हिरमोड होतो. तिला वाटतं आधी प्रेंक आहे मात्र नंतर तरुण खरंच अंगठी खाली कोसळल्याचं सांगतो.
गर्लफ्रेंडला खूप जास्त वाईट वाटतं. तिचा चेहरा उतरतो. ती अंगठी कुठे पडली हे पाहण्याचा प्रयत्न करते. त्याच वेळी तरुण तिला खरी अंगठी काढून हा प्रँक असल्याचं सांगतो आणि प्रपोज करतो. हा तरुणाचा प्रपोज करण्यासाठी प्लॅन होता असंही तो तिला सांगतो.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगानं व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ कुठला आहे याची माहिती मिळू शकली नाही. 4.7 लाखहून अधिकवेळा हा व्हिडीओ पाहिला गेला आहे. ओरिजनली इनसाइड एडिशन नावाने हा व्हिडीओ युट्यूबवर शेअर करण्यात आला आहे.