Climate Change Impact: जागतिक तापमानवाढीमुळं जगावर कुठवर आणि किती परिणाम होणार याची माहिती मागील काही वर्षांमध्ये सातत्यानं विविध स्तरांवर दिली जात आहे. याच जागतिक तापमानवाढीमुळं आता संपूर्ण जीवसृष्टीच धोक्यात आल्याचं दिसत आहे. कारण, जलवायु परिवर्तनाचे थेट परिणाम थेट पृथ्वीच्या गतीवर होताना दिसत आहे. एका निरीक्षणातून ही बाब समोर आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्रीनलँड आणि अंटार्क्टिकासारख्या ठिकाणांवर कैक वर्षांपासून असणारा बर्फ अतिशय वेगानं वितळत असल्यामुळं जागतिक स्तरावर महासागरांचा जलस्तर वाढत आहे. इतकंच नव्हे तर पृथ्वी सध्या ज्या गतीनं परिभ्रमण आणि परिक्रमण या क्रिया करत आहे, त्यामध्ये या जागतिक तापमानवाढीचे परिणाम दिसणार असून, पृथ्वीचा वेग मंदावण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. 


नेचर जर्नलमधील अहवालामध्ये याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात आली असून, सद्यस्थिती आणि सातत्यानं होणारे बदल ग्लोबल वॉर्मिंग अर्थात जागतिक तापमानवाढीआधी ग्लोबल टाइमकीपिंगवर परिणाम करताना दिसत आहे. 


जगाची वेळ बदलतेय? 


जगभरातील घडाळ्यांचा वेळ निश्चित करण्यासाठी 'कोऑर्डिनेटेड यूनिवर्सल टाइम' (UTC) ची मदत होते. ही वेळ पृथ्वीच्या वेगानुसार निर्धारित होते. पण, हा वेग निश्चित नसल्यामुळं जगभरातील विविध ठिकाणी दिवस आणि रात्रीचा कालावधी अनिश्चित असतो. पृथ्वीचा वेग ज्यावेळी कमी होतो तेव्हा दिवस मोठा होतो.  त्याच आधारे ग्लोबल टाइमकीपर्सनं 1970 मध्ये जागतिक घड्याळात 27 लीप सेकंद जोडली होती. पण, आता याच घड्याळात 2026 मध्ये एक सेकंद कमी करण्याचा विचार केला जात आहे. या कृतीला 'निगेटिव लीप सेकंद'  म्हटलं जातं. 


हेसुद्धा वाचा : Loksabha Election 2024 : 'बच्चू, हिंमत असेल तर...' संजय राऊतांकडून श्रीकांत शिंदे यांना खुलं आव्हान


आतापर्यंत 'निगेटिव लीप सेकंद'चा वापर करण्यात आला नव्हता. पण, येत्या काळात हा वापर झाल्यास जगभरातील संगणकांसाठी (Computer System) एक मोठी समस्या निर्माण होणार आहे. तज्ज्ञांच्या मते जागतिक स्तरावर एकच वेळ दर्शवल्यास जगभरातील संगणकाची कोडिंग पुन्हा करावी लागू शकते.