Global Warming : पृथ्वीच्या दिशेने येणारी सौर वादळे तसेच धुमकेतू धडकण्याचा धोका यामुळे आधीच वैज्ञानिक चिंतेत आहेत. त्यातच आता भविष्यात पृथ्वी आगीचा गोळा बनू शकते. 2023 मध्येच  याचे भयानक संकेत मिळणार आहेत. यामुळे  वैज्ञानिकही टेन्शनमध्ये आले आहेत. Global Warming मुळे पृथ्वीवर मोठे संकट ओढावू शकते अशी भिती व्यक्त केली जात आहे. 


वातावरणात लक्षणीय बदल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2023 या वर्षात वातावरणात लक्षणीय बदल पहायला मिळत आहेत. यंदा अनेक ठिकाणी जगभरात थंडीची लाट आली तर अनेक ठिकाणी उष्णतेचा कहर पहायला मिळला. मान्सून लांबला. उशीराने आगमन झालेल्या मान्सूनने अनेक ठिकाणी पूर आलेत. Global Warming मुळे हवामानात बदल होत आहेत. भविष्यात वातावरणात झालेले बदल मोठ्या संकटासाठी कारणीभूत ठरु शकतात अशी भिती देखील व्यक्त केली जात आहे.  Global Warming सह मानवी चुका देखील याला कारणीभूत ठरत आहेत. कारण, मोठ्या प्रमाणात उर्जेचा वापर केला जात असल्यामुळे वायू मंडळात  ग्रीनहाउस गॅसचे मोठ्या प्रमाणात उत्सर्जन होत आहे. यामुळे तापमानात प्रचंड वेगाने वाढ होत आहे. परिणमी पृथ्वीचे तापमान देखील वाढत आहेत. पृथ्वीच्या तापमानात प्रति दशक 0.2 डिग्री फारेनहाइट म्हणजेच 0.1 सेल्सियस इतकी वाढ होत आहे. 


ज्वालामुखीचे स्फोट


जगभरात अनेक ठिकाणी ज्वालामुखीचे स्फोट होत आहेत. या ज्वालामुखीच्या उद्रेकाचा देखील जागतीक तापमानावर गंभीर परिणाम होत आहे. 2022 मध्ये दक्षिण प्रशांत महासागराच्या टोंगा बेटावर ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. ऑस्ट्रेलिया खंडात हे टोंगा बेट वसलेले आहे. ज्वालामुखीच्या स्फोटानंतर प्रशांत महासागरात त्सुनामीच्या लाटा उसळल्या होत्या.  21 व्या शतकातील हा ज्वालामुखीचा सर्वात शक्तीशाली स्फोट मानला जात आहे. यामुळे समुद्रातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभन झाले. परिणामी तापमानात लक्षणीय वाढ झाली. भविष्यात हे निश्चितच धोकादायक ठरू शकते. 


सौर वादळ


एक महाभयंकर विनाशकारी  सौर वादळ पृथ्वीच्या दिशेनं झेपावत आहे. सूर्यावर शक्तीशाली स्फोट होत आहेत. या सौर ज्वाळांचा देखूल पृथ्वीच्या तापमानात लक्षणीय वाढ होत आहे. 


अल निनो वादळ


उत्तर गोलार्धात अल निनो वादळटा प्रभाव पहायला मिळत आहे.  उष्णकटिबंधीय पॅसिफिकमध्ये, पृष्ठभागाच्या पाण्याची दिशा बदलून प्रचंड उष्णता निर्माण होत आहे.  2016 पासून  अल निनोचा प्रभाव पहायला मिळत आहे. अल निनोमुळे तापमानात 0.14  सेल्सियस इतकी वाढ झाली आहे.