टोकियो : धूम्रपान न करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी जपानची एक कंपनी अधिक सुट्टी देणार आहे. ऑनलाइन कॉमर्स कन्सल्टिंग अँड मार्केटिंग कंपनी पिआला ने सप्टेंबरपासून ही योजना सुरु केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका कर्मचाऱ्याने धूम्रपान करणारी व्यक्ती अनेकदा जागेवरून उठत असल्याने वेळ वाया जात असल्याची तक्रार केली होती.  प्रवक्ता हिरोताका मत्सुशिमा यांनी सांगितले की, आमचे ऑफिस २९ व्या मजल्यावर असल्याने धुम्रपानासाठी खाली जाण्यासाठी जवळजवळ १० मिनिटे वाया जातात. त्यामुळे धूम्रपान करणाऱ्यांना सुधारवण्यापेक्षा धूम्रपान न करणाऱ्यांना बक्षीस देण्याचे आम्ही निर्णय घेतला असल्याचे मत्सुशिमा यांनी सांगितले.


१ सप्टेंबरपासून या उपक्रम सुरु केल्याने धूम्रपान करणाऱ्या ४२ कर्मचाऱ्यांपैकी चार जणांनी आपली सवय बदलली. कंपनीत एकूण १२० कर्मचारी काम करतात.