अशक्य झाले शक्य, सूर्याला प्रथमच स्पर्श !
NASA News : सूर्य म्हटले आग ओखणारा अशी ओळख. सूर्याच्या आगीशी कोणीही खेळू शकत नाही, असं म्हटलं जात होतं. मात्र...
नवी दिल्ली : NASA News : सूर्य म्हटले आग ओखणारा अशी ओळख. सूर्याच्या आगीशी कोणीही खेळू शकत नाही, असं म्हटलं जात होतं. मात्र, जे अशक्य होते ते शक्य करुन दाखविण्यात नासाच्या शास्त्रज्ञांना यश आले आहे. (NASA spacecraft Parker Solar Probe 'touches' the sun for the Solar System)
नासाकडून सूर्याचे संशोधन करण्यात येत आहे. त्यासाठी अभ्यास करण्यात येत आहे. सूर्याचे संशोधन करताना नासाने मोठा पराक्रम केला आहे. सूर्याच्या वातावरणात शिरत यानाची फेरी घातली. 20 लाख फॅरनहाईट तापमानात पार्कर सोलर प्रोब दाखल झाला. सूर्याच्या अतिउष्ण वातावरणाला प्रथमच स्पर्श करण्यात यश आले आहे.(NASA Spacecraft Has ‘Touched’ the Sun)
नासाने अंतराळ संशोधनात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. सूर्याच्या वातावरणात शिरून त्यातून फेरी मारण्याचा पराक्रम नासाने केला आहे. नासाने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी 2018 मध्ये सोडलेल्या द पार्कर सोलर प्रोबने सूर्याच्या वातावरणात शिरत फेरी मारली. सूर्याच्या अतिउष्ण वातावरणाचे नाव 'कोरोना' असे आहे. इथे जवळपास 20 लाख फॅरेनहाईट एवढे तापमान असते. 28 एप्रिलला प्रोबने ही फेरी मारल्याचे नासाने जाहीर केलंय.