अशी 12 ठिकाणं ज्यांना Google Map वर देखील पाहायला मनाई, जाणून घ्या कारण
Google Maps तुम्हाला सगळेच रस्ते दाखवत नाही. काही अशा जागा आहे. ज्या Google Map वरुन हटवण्यात आल्या आहेत.
मुंबई : आपल्याला कुठेही जायचं असेल की, आपण रस्ता शोधण्यासाठी Google Map ची मदत घेतो. पूर्वी आपल्याला कोणत्याही ठिकाणावर पोहोचण्यासाठी रस्ता माहित असणं गरजेचं होतं. परंतु आता तुम्हाला रस्ता माहिती नसेल तरी देखील तुम्ही तुमची ठिकाण Google Map वर टाकलं, तरी आपल्या रस्ता मिळतात. एवढेच काय तर गुगल पर्यायी मार्ग देखील आपल्याला दाखवतो. Google Map चा वापर करुन केव्हा ही कुठेही प्रवास करु शकतो. आपण कोणताही ठिकण गुगल वर टाकलं की आपल्याला तो दाखवतोच. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की, अशी कोणतीही जागा नाही, जी गुगला माहिती नसेल, परंतु तुमच्या समज चुकीचा आहे.
Google Maps तुम्हाला सगळेच रस्ते दाखवत नाही. काही अशा जागा आहे. ज्या Google Map वरुन हटवण्यात आल्या आहेत. त्यामुळे गुगल तुम्हाला त्या जागा किंवा तेथे जाण्याचा रस्ता कधीही दाखवणार नाही.
आता या जागा कोणत्या आणि त्या गुगुल वरुन का हटवण्यात आल्या आहेत, याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.
1. Prison de Montlucon, France: Google मध्य फ्रान्समधील तुरुंग आपल्याला कधीही दाखवत नाही. सुरक्षेच्या कारणास्तव फ्रेंच सरकारच्या विनंतीवरून हे 2018 मध्ये ते गुगलवरुन काढून टाकण्यात आले आहे.
2. Moruroa, French Polynesia: मोरुरोआ हे दक्षिण प्रशांत महासागरातील एक लहानबेट (Atoll) आहे. त्यावर बंदी का घालण्यात आली याचे कारण स्पष्ट झाले नसले तरी, या बेटाचा अण्वस्त्र इतिहास असल्याचे सांगितले जाते.
3. 2207 Seymour Avenue, Ohio: Ariel Castro : 2002 आणि 2004 च्या दरम्यान, एरियल कॅस्ट्रो नावाच्या व्यक्तीने काही मुलींचे अपहरण केले आणि त्यांना ओहायोच्या एका घरात ठेवले. त्याने मुलींना 2013 पर्यंत आपल्याकडे बंधीस्त ठेवले होते. ज्यानंतर गुगल मॅपवरही या जागेवर बंदी घालण्यात आली आहे.
4. House in Stockton-on-Tees: यूकेमधील प्रिन्सपोर्ट रोडवर असलेले स्टॉकटन-ऑन-टीज हे Google वर दाखवले जातात.
5. Jeannette Island, Russia : हा बर्फाच्छादित बेट 1.2 मैल लांब आहे. असे मानले जाते की, रशिया आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे हे बेट गुगल मॅपवर अस्पष्ट आहे.
6. Norh Korea: गुगलवरही उत्तर कोरियाचे अनेक भाग अस्पष्ट आहेत. तेथील सरकारच्या सांगण्यावरुन हे असे करण्यात आलेले आहे.
7. Amchitka Island - Alaska: अमचिटका बेटावर 50, 60 आणि 70 च्या दशकात अमेरिकेची आण्विक चाचणी झाली. मात्र गुगल मॅपवर त्यातील अनेक भाग अस्पष्ट आहेत. अमेरिकेने येथे अनेक भूमिगत अणुचाचण्या केल्या आहेत.
8. Greek military base : ग्रीसची राजधानी अथेन्समध्ये असलेला हा लष्करी तळ गुगल मॅपवर पूर्णपणे पिक्सेलेटेड आहे. हे सुरक्षेच्या कारणामुळे करण्यात आलेले आहे.
9. French nuclear facility: फ्रान्समधील AREVA ला हेग आण्विक इंधन पुनर्प्रक्रिया सुविधा देखील Google वर अस्पष्ट आहे. ते 1976 मध्ये उघडण्यात आले. येथून अनेक देशांना अणुइंधन दिले जाते.
10. Polish Special Forces base: पोलंडच्या स्पेशल फोर्सेस कमांडचे प्रशिक्षण येथे होते. ज्यामुळे ते google वर देखील अस्पष्ट आहे.
11. Patio de los Naranjos, Spain: Patio de los Naranjos स्पेनमध्ये आहे, हे ठिकाण सरकारी कार्यालयांच्या जवळ आहे. हे ठिकाण गुगलवर का दाखवले जात नाही हे स्पष्ट नाही.
12. Tim Cook's house: ऍपलने आपल्या नकाशा सेवेत टिम कुकच्या घराचे स्थान दर्शविणारी 'अदृश्य भिंत' दाखवली आहे. अशा परिस्थितीत आता टीम कुकचे घर सार्वजनिकपणे कोणीही पाहू शकणार नाही. त्याचवेळी गुगल मॅपवरही त्याच्या घराचा काही भाग पिक्सेलेटेड दाखवला जातो. टिम कुकच्या या घराची किंमत 25 कोटींहून अधिक आहे आणि सुरक्षेच्या दृष्टीने असे करण्यात आले आहे.