Google Map मुळं बर्फाच्छादित पर्वतरांगांमध्ये दिसला रहस्यमयी दरवाजा; Viral Photo मुळं वाढला गुंता
Google Map Secret Door Viral Photo : अंटार्क्टिकाच्या बर्फाच्छादित पर्वतरांगांमध्ये अनेक रहस्य दडली असून, त्यांचा उलगडा करण्यासाठी संशोधक सतत प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळतं.
Google Map Secret Door Viral Photo : मागील काही वर्षांमध्ये तंत्रज्ञान इतकं पुढं गेलं की, घरबसल्या जगाच्या पाठीवर असणाऱ्या अनेक गोष्टींची अगदी सहजच माहिती मिळू शकते. Google Map त्याचच एक उदाहरण. संपूर्ण जगाचा नकाशा एका क्लिकवर दाखवणाऱ्या या एका कमाल अॅपमध्ये सध्या एका युजरला अनपेक्षित गोष्ट दिसली आणि संपूर्ण जगात त्याचीच चर्चा झाली.
'रेडिट' वरील युजरच्या पोस्टनं सर्वांचं लक्ष वेधलं, जिथं अंटार्क्टिकाा खंडाचे दोन फोटो व्हायरल झाले. या दोन फोटोंमध्ये दिसणाऱ्या गोष्टी पाहता तो एक दरवाजा असल्याचं प्रथमदर्शनी स्पष्ट झालं. या अनपेक्षित फोटोंना पाहून युजर्सनी तर्कवितर्कांच्या बळावर उत्तर देण्यास सुरुवात केली.
काय आहे या दारामागचं रहस्य?
realg00n नावाच्या या युजरनं दोन फोटो शेअर केले आणि त्या ठिकाणाचं लोकेशनही शेअर केलं. या फोटोवर नेटकऱ्यांनी व्यक्ती होत तो मुळातच 20 मार्च 2024 रोजी टीपलेला फोटो असल्याचं सांगितलं. जाणकार आणि संशोधकांच्या माहितीनुसार हा दरवाजा म्हणजे एक नैसर्गिक रचना असून, तो प्रत्यक्षात दरवाजा नसून, त्यासम दिसणारा एक महाप्रचंड हिमखंड आहे. बर्फ आणि या हिमखंडाखालील पृष्ठपाहता त्यामुळं त्याला एखाद्या दरवाजाप्रमाणं आकार मिळाल्याचं कळत आहे.
हेसुद्धा वाचा : Home Loan चा हफ्ता महागणार की...; व्याजदराबाबत RBI गव्हर्नर स्पष्टच बोलले
Massive door in Antarctica? 3/20/24
byu/realg00n inconspiracy
काही नेटकऱ्यांच्या मते दरवाजाप्रमाणं दिसणारी ही वस्तू अतिशय मोठी असून, ती साधारण 20 फूट लांब आणि 15 फूट रुंद असल्याचं म्हटलं जात आहे. काहींच्या माहितीनुसार ही एखाद्या गोष्टीची सावलीही असू शकते. काही नेटकऱ्यांनी मात्र या वस्तूभोवती असणारं रहस्यांचं वलय कायम ठेवत ही रहस्य कमाल असल्याचीच प्रतिक्रिया दिली. गुगल मॅपमुळं व्हायरल झालेल्या एका फोटोवर इतक्या युजर्सनी प्रतिक्रिया दिली, की त्या फोटोमागचे वेग ळे दृष्टीकोन आणि नेमकी बाबही ओघानं समोर आली. त्यानिमित्तानं ही माध्यमं नेमकी किती कमाल आहेत याचीही प्रचितीच आली... नाही का!