मोठी बातमी! इम्रान खान यांच्या घऱात 30 ते 40 दहशतवादी; एकच खळबळ, पोलिसांचा संपूर्ण परिसराला घेराव
Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Pakistan Prime Minister Imran Khan) यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. त्यातच आता पाकिस्तानमधील पंजाब सरकारने इम्रान खान यांच्या जमान पार्क येथील घरात 30 ते 40 दहशतवादी (Terrorist) लपले असल्याचा दावा केला आहे. यानंतर पोलिसांनी घराला घेरलं आहे.
Terrorist in Imran Khan Home: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Pakistan Prime Minister Imran Khan) यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. एकीकडे त्यांच्या अटकेवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद सुरु असताना दोन्ही बाजूंचे समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. त्यातच आता पाकिस्तानमधील पंजाब सरकारने इम्रान खान यांच्या लाहोर येथील जमान पार्क येथील घरात 30 ते 40 दहशतवाद्यांनी (Terrorist) आश्रय घेतल्याचा आऱोप केला आहे. यानंतर पोलिसांनी पुढील 24 तासात या दहशतवाद्यांना सोपवा असा इशारा दिला आहे.
लाहोरमध्ये पत्रकार परिषदेला संबोधित करताना कार्यवाहक माहिती मंत्री आमिर मीर यांनी माहिती दिली की, 'पीटीआयने या दहशतवाद्यांना पोलिसांच्या ताब्यात द्यावे अन्यथा कायद्यानुसार कारवाई कऱण्यात येईल". सरकारे गुप्तचर यंत्रणांची माहिती असल्याने या दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दल माहिती होती असंही त्यांनी सांगितलं आहे.
मीर यांनी सांगितलं की "गुप्तचर यंत्रणांनी दिलेला रिपोर्ट फारच भयानक आहे. जिओ फेंसिंगच्या माध्यमातून यंत्रणांनी जमान पार्कमध्ये दहशतवाद्यांच्या उपस्थितीबाबत पुष्टी केली आहे". पीटीआयचे प्रमुख गेल्या एक वर्षापासून लष्करावर निशाणा साधत आहेत अशी टीका करताना त्यांनी दहशतवाद्यांना पोलिसांच्या ताब्यात द्या असं सुनावलं आहे.
9 मे रोजी जिन्ना हाऊसवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पंजाब सरकारने पीटीआयचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री डॉक्टर यास्मीन राशिद, मियां महमुदूर रशीद यांना जबाबदार धरण्यात आलं आहे. पीटीआयचे नेते यास्मीन रशीद, मियां महमुदूर रशीद आणि इतरांनी लिबर्टी चौकात पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांना फोन केले होते असा खुलासा पीटीआयचेच नेते इबाद फारुक यांनी केला होता.
पीटीआयच्या नेत्यांनीच आंदोलनकर्त्यांनी जिन्ना हाऊसमध्ये आग लावण्यास सांगितलं. जे काही झालं ते योग्य नव्हतं असं इबाद फारुक यांनी म्हटलं आहे. त्यांनी आपलं निवडणुक तिकीटही परत करण्याची घोषणा केली आहे.
9 मे पासून पाकिस्तान पेटला आहे
9 मे रोजी इम्रान खन यांना इस्लामाबाद हायकोर्टाच्या परिसरातून भ्रष्टाचार प्रकरणी अटक करण्यात आली होती. NAB ने केलेल्या या कारवाईनंतर संपूर्ण देशात हिंसाचार उफळला होता. पीटीआय पक्षाच्या समर्थकांनी रस्त्यांवर उतरुन अनेक इमारती आणि गाड्यांना आग लागली होती. समर्थक इतक्यावरच थांबले नाहीत. त्यांनी पोलीस आणि लष्कराच्या इमारतींवरही हल्ला केला. या हिंसक आंदोलनात 10 लोकांचा मृत्यू झाला आहे.
9 मे रोजी झालेल्या हिंसाचाराबद्दल इम्रान खान यांच्या हजारो समर्थकांना अटक करण्यात आलं होतं. पाकिस्तानी लष्कराने 9 मे हा देशातील काळा दिवस असल्याचंही म्हटलं होतं.