drought hit Namibia : ग्लोबल वार्मिंगचा मोठा फटका जगाला बसत आहे. उष्णता वाढल्यामुळे हिम पर्वत वितळत आहेत. तर, समुद्राचा जलस्तर देखील वाढत आहे. हवामान बदलामुळे आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये दुष्काळास्थिती निर्माण झाली. याची सर्वाधिक झळ ही नामिबिया या देशाला बसली आहे. नामिबियामध्ये भयानक दुष्काळ पडला आहे. इथं लोकांना अन्न खायला मिळत नाही. अशा स्थितीत भूकबळीने लोकांचा मृत्यू होऊ नये यासाठी  जंगलातील 700 पेक्षा अधिक प्राणी मारुन जनतेला खायला देण्याचे आदेश नामिबिया सरकारने काढले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नामिबिया सध्या दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे. लोकसंख्येने कमी असलेला नामिबिया तसा गरिब देश आहे. नामिबियात सध्या तीव्र दुष्काळी परिस्थित निर्माण झाली आहे.  शेती आणि जीव संवर्धनावर ताण येत आहे. देश दुष्काळात होरपळत असल्याने नामिबिया सरकारने आणीबाणीची स्थिती घोषित केली आहे. 3 दशलक्ष लोकांपैकी जवळजवळ अर्ध्या लोकांना अन्न खायला मिळत नाही. देशातील अर्ध्या पेक्षा अधिक लोकांना अन्न टंचाईचा सामना करावा लागत आहे. 


जंगालातील प्राणी मारुन जनतेला खायला देणार


भूकमारीमुळे देशातील लोकांचा मृत्यू होऊ नये यासाठी  नामिबिया सरकारने  मोठा निर्णय घेतला आहे. जंगालातील प्राणी मारुन जनतेला खायला  दिले जाणार आहेत. नामिब नौक्लुफ्ट पार्क, मँगेट्टी नॅशनल पार्क, ब्वाबवाता नॅशनल पार्क, मुदुमु नॅशनल पार्क आणि एनकासा रुपारा नॅशनल पार्क या प्राणी संग्रहालयातील प्राणी मारण्याचे टेंडर सरकारने काढले आहेत. 


वनीकरण आणि पर्यटन मंत्रालयाने निवदेन जारी केले आहे. मंत्रालयाचे प्रवक्ते रोमियो मुयुंदा यांनी या निवेदनात प्राणी मारण्याचे  आदेश दिले आहेत. यामुळे सरकारवरील प्राणी संवर्धावरील ताण आणि खर्च कमी होईल तसेच. लोकांची अन्नाची गरज भागेल असे देखील रोमियो यांनी म्हंटले आहे.  83 हत्ती, 30 पाणघोडे, 100 एलँड आणि 300 झेब्रा यांच्यासह 700 हून अधिक प्राणी मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  यापूर्वी देखील नामिबियामध्ये अशा प्रकारची दुष्काळस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळे नामिबिया सरकारने दुष्काळाचा सामना करण्यासाठी 200 पेक्षा अधिक प्राणी विक्रीला काढले होते.