साओ पाउलो : ब्राझीलमधील अमेजन येथे ग्रीनप्रीसच्या एका छोट्या विमानाला अपघात झाला. यात एका महिलेचा मृत्यू झाला. या विमानातून ५ प्रवासी प्रवास करत होते. पर्यावरण समूह ग्रीनपीस यांनी सांगितले की, एक इंजिन असलेल्या या विमानाला अमेजनची राजधानी मानउस जवळ अपघात झाला. या दुर्घटनेत पायलट आणि ३ कर्मचारी बचावले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही मृत महिला २९ वर्षांची असून तिची ओळख कुटुंबियांना पटली आहे. ती स्वीडन येथे राहणारी होती.