नवी दिल्ली : पाकिस्तानी माध्यमांतून यावेळी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. कुख्यात दहशतवादी हाफिज सईद याला पाकिस्तानी न्यायालयाने दोषी ठरवले आहे. गुंजरावाला कोर्टाने हाफिज सईदला टेरर फंडींग प्रकरणी हा निकाल दिला आहे. हाफिजचे प्रकरण आता पाकिस्तानच्या गुजरातमध्ये वर्ग करण्यात आले आहे. 17 जुलैला हाफिज सईदला गुंजरावाल येथून अटक करण्यात आली होती. यानंतर हाफिज सईदला 7 दिवसांची पोलीस कोठडी दिली गेली. 24 जुलैला न्यायालयाने हाफिज सईदच्या कोठडीत 14 दिवसांनी वाढ केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानच्या काऊंटर दहशतवाद विरोधी पथकाने (CTD) हाफिजविरोधात 7 ऑगस्ट पर्यंत चार्जशीट फाईल करण्याचे निर्देश दिले होते. 17 जुलैला पाकिस्तानातील पंजाबच्या सीटीडीने लाहोरहून गुंजरवाला येथे जाणाऱ्या हाफिज सईदला अटक केली होती. या महिन्याच्या सुरुवातीसच हाफिज आणि इतर 12 सहकाऱ्यांविरोधात दहशतवादाला खतपाणी घालण्या संदर्भात 23 गुन्हे दाखल करण्यात आले होते.



5 ट्रस्टच्या माध्यमातून हे आरोपी दहशतवादी संघटनांना आर्थिक पाठबळ पुरवत असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. जमात-उद-दावा आणि फलाह-ए-इंसानियत या संघटनांविरोधात लाहोर, गुजरांवला आणि मुलतान येथे तक्रार दाखल करण्यात आल्या. आंतरराष्ट्रीय दबावानंतर पाकिस्तानने दहशतवादाविरोधात हे पाऊल उचलले.