नवी दिल्ली: जगभरात लठ्ठ माणसे आपण पाहिली असतील. पण, एखाद्या लठ्ठ व्यक्तिच्या शरीराखाली दबून कोणा व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे आपण ऐकले आहे? कदाचित नसेल. पण, खरेच असे घडले आहे. अमेरिकेतील टेक्सास येथे राहणाऱ्या एका महिलेच्या शरीराखाली दबून तिच्या पुतण्याचा जागेवरच मृत्यू झाला आहे. मायरा रोजलेस (वय ३४ वर्षे) असे या महिलेचे नाव असून, तिचे वजन ४५० किलोग्रॅम (१००० पाऊंड) इतके आहे. मायरावर २ वर्षीय पुतण्याच्या हत्येचा आरोप आहे. हे वृत्त समजताच लोकांनी तिला 'आर्धा टन वजनाची खुनी' असे नाव दिले आहे.


मायराने फेटाळला आरोप


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्थानिक नागरिकांनी आरोप केला आहे की, मायराने आपल्या २ वर्षीय (नाव - एलिसीयो) पुतण्याला शरीराखाली चिरडून ठार मारले. पण, मायराने पुतण्याच्या हत्येचा आरोप आपल्या बहिणीवर ठेवला आहे. मायराने म्हटले आहे की, आपल्या बहिणीने एक हेयरब्रास एलिसीयोच्या डोक्यावर मारला. ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. मायराने सांगते की, २००८ पासून मी शरीरात होणाऱ्या प्रचंड मोठ्या बदलाला सामोरे जात आहे. वजन कमी करण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. आता माझी प्रकृती ठिक असून मला कोणताही समस्या नाही.


मायराच्या शरीरावर ३० हून अधिक वेळ सर्जर


दरम्यान, मायराने सांगितले की, आता मला ना मधुमेह आहे ना अती कोलेस्ट्रॉल. मला उच्च रक्तदाबाचा त्रासही नाही. वाढत्या वजनावर नियंत्रण मिळविण्यासाठी तिला चांगल्या डाएटसोबतच शस्त्रक्रियेचाही मार्ग निवडण्यात आला. मायराच्या शरीरावर ३० हून अधिक वेळ सर्जरी करण्यात आली. तिच्यावर झालेल्या जास्तीत जास्त शस्त्रक्रिया या डॉ. योयुनान नाऊजार्डेन यांच्या निगराणीखाली करण्यात आलेल्या आहेत. मायराला टीव्ही शो मधील ६०० पाऊंडची लाईफ स्टार म्हणूनही ओळखले जाते. या शोमध्ये सर्वासामान्य जीवन जगायला मिळावे म्हणून संघर्ष केलेल्या व्यक्तिमत्वाची जीवनगाथा सांगितली जाते. डॉक्टरांनी म्हटले आहे की, मायरा एक जबरदस्त प्रेरणादाई मुलगी आहे. लोक जेव्हा अधिक काळासाठी आंथरुणाला खिळतात तेव्हा ते, सर्वसामान्य जीवन जगण्याची आस सोडून देतात. पण, मायरा याला अपवाद ठरली. तीने संघर्ष केला आणि आता ती स्वत:च्या बळावर सर्वसामान्य जीवन जगत आहे.