Halloween दरम्यान चेंगराचेंगरी, 50 जणांना एकाचवेळी आला हार्ट अटॅक; पाहा VIDEO
बापरे! एकाचवेळी 50 जणांना आला हार्ट अटॅक, VIDEO पाहून तुम्हालाही धक्का बसेल
दक्षिण कोरियात हॅलोविन (Halloween) सेलिब्रेट करत असताना चेंगरा चेंगरीची (halloween stampede) घटना घडलीय. या घटनेत चेंगरा चेंगरीमुळे एकाचवेळी 50 जणांना हार्ट अटॅक (Heart Attack) आल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर घटनास्थळीच रूग्णांचे प्राण वाचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
विदेशात ख्रिस्ती बांधव दरवर्षी 31 ऑक्टोबरला हॅलोविन (Halloween) साजरा करत असतात. त्यामुळे सध्या विदेशात हॅलोविनची क्रेझ आहे. हा हॅलोविन (Halloween) दक्षिण कोरियाची (south korea) राजधानी सोलमध्ये सेलिब्रेट करत असताना एक विचित्र दुर्घटना घडली आहे. हॅलोविनच्या कार्यक्रमादरम्यानच चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडलीय. या घटनेत 50 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात येत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार या हॅलोविनच्या (Halloween) कार्यक्रमा दरम्यानच डझनभर लोकांना हृदयविकाराचा झटकाही आला आहे. या घटनेनंतर राष्ट्राध्यक्ष युन सुक-योल यांनी आपत्ती व्यवस्थापन पथक इटवॉन, योंगसान-गु येथे तत्काळ तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच बचाव पथकासोबतच स्थानिक प्रशासन आणि पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले आहेत.
दरम्यान या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. या व्हिडिओत आरोग्य कर्मचारी जमिनीवर पडलेल्या लोकांना सीपीआर उपचार देत आहेत. ही घटना शनिवारी रात्री उशिरा घडली होती. या घटनेत जखमींना युद्ध पातळीवर वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहे.