Israel Conflict : आता सुट्टी नाही! इस्त्रायलवरील हल्ल्यात 9 अमेरिकन नागरिकांचा मृत्यू; युएस युद्धनौका रवाना
Israel Hamas War News : अमेरिकेला (America) जागतिक राजकारणात खूप रस असतो. अफगाणिस्तान तालिबान युद्धात याची प्रचिती सर्वांना आली असेल. अशातच आता इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात आता अमेरिकेची एन्ट्री झालीये.
Americans killed In Hamas Attack : दहशतवादी संघटना हमासनं (Hamas) युद्धाचे सारे नियम मोडले आहेत. इस्रायलवर हल्ला (Israel Attack) करताना नागरिकांनाही सोडलं नाही. विशेष म्हणजे इस्रायलसह अमेरिका, जर्मनी आणि युरोपियन देशांचे नागरिक हमासच्या रानटी हल्ल्यात मारले गेले आहेत. हमासच्या याच क्रूर वागण्याविरोधात आता अमेरिका रणमैदानात उतरलीय. इस्रायलच्या मदतीसाठी अमेरिकेनं लष्करी कुमक (America In war) पाठवली आहे. अशातच आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नऊ अमेरिकन नागरिकांचा मृत्यू
हमासच्या हल्ल्यात 9 अमेरिकन नागरिकांचा मृत्यू (Americans killed In Hamas Attack) झाल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या सरकराने याबाबतची अधिकृत माहिती दिली. त्यामुळे आता इस्रायल आणि हमासच्या (Israel vs Hamas) युद्धात आता अमेरिकेची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे आता अमेरिका हमासचा खात्मा करणार हे नक्की झालंय.
अमेरिकेची एंट्री, हमासला धडकी
युएसएसच्या गेराल्ड ही युद्धनौका अमेरिकेनं पूर्व भूमध्य समुद्रात उतरवलीय. अमेरिका फोर्डसह क्रूजर USS नॉरमैंडी, विनाशिका ‘USS थॉमस हडनर’, ‘USS रैमेज’, ‘USS कार्नी’ आणि ‘USS रूजवेल्ट’ सोबतीला असतील. तर अमेरिकन वायुदलाची F-35, F-15, F-16 आणि A-10 लढाऊ विमानांची स्क्वाड्रन तैनात करण्यात आलीय. याशिवाय 5000 अमेरिकन नौसैनिक रवाना झाले आहेत.
आता सुट्टी नाही...
चार दशकांपासून अमेरिका आणि इस्रायल एकमेकांची मित्रराष्ट्र आहेत. मध्यपूर्वेतील राजकीय घडामोडींवर इस्रायलच्या माध्यमातून अमेरिकेची पकड कायम असते, अशी एक थिअरी सांगितली जाते. पहिलं महायुद्ध असोत वा दुसरं महायुद्ध. अमेरिका युद्धात उतरते त्या बाजूचं पारडं जड होतं. आता इस्रायलच्या सोबतीला अमेरिका मैदानात आलीय. त्यामुळे हमासची काही खैर नाही, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.