Hamas Terrorists Planning: हमास आणि इस्रायलमधील युद्ध संपण्याची चिन्ह दिसत नाहीत. 7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला. या हल्ल्यात 1400 इस्रायली मारले गेले आणि 200 हून अधिक लोकांना हमासने ओलिस ठेवले. इस्रायलची गुप्तचर संस्था मोसाद ही जगभरात अव्वल मानली जाते. या हल्ल्यामुळे त्यांच्या विश्वासार्हतेला मोठा धक्का बसला. इस्रायलविरोधी दहशतवाद्यांना घरात घुसून मारण्याचा दम ठेवणाऱ्या मोसादला हमासच्या दहशतवाद्यांचा कट कसा कळला नाही? हा मोठा प्रश्न उपस्थित होतोय. याचे नेमके कारण आता समोर आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हमासने इस्रायलवर एवढा मोठा हल्ला करण्यापुर्वी कशी तयारी केली? इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणेला कसे अनभिज्ञ ठेवले? याची कहाणी खूपच रोचक आहे. इतर सर्व देशांना भविष्यासाठी महत्वाची ठरणारी आहे.
हमासच्या कार्यकर्त्यांनी असे काय केले की इस्रायली गुप्तचर यंत्रणांना त्यांच्या योजनांची माहितीही नव्हती, याबाबत आता एक मोठा खुलासा समोर आला आहे.


इस्रायलवर हल्ल्याची योजना आखण्यासाठी हमासच्या सैनिकांनी 2 वर्षांहून अधिक काळ भूमिगत फोन लाइनचा वापर केला होता. हमासच्या दहशतवाद्यांचा एक छोटा सेल इस्रायलवर प्राणघातक अचानक हल्ल्याची योजना आखत होता.  युनायटेड स्टेट्सला गुप्तचर यंत्रणांनी अशी माहिती दिली.


हमासकडून दोन वर्षापासून तयारी 


हा सेल दोन वर्षांपासून गाझामधील बोगद्यांच्या नेटवर्कमध्ये हार्ड-वायर्ड फोनच्या नेटवर्कद्वारे संवाद साधत होता. या प्रकरणाशी परिचित असलेल्या दोन सूत्रांनी ही माहिती दिली आहे.बोगद्यांमधील फोन लाइन्समुळे हमासच्या सैनिकांना गुप्तपणे एकमेकांशी संवाद साधता आला. हे संभाषण इस्त्रायल ट्रॅक करू शकले नाही. 7 ऑक्टोबरला हल्ला होईपर्यंत त्यांच्या हे लक्षातच आले नाही.


इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरूच


7 ऑक्टोबरच्या भीषण हल्ल्यानंतर इस्रायलने गाझाविरुद्ध युद्धाची घोषणा केली होती. यानंतर इस्रायलकडून हमासच्या ताब्यातील गाझावर सतत बॉम्बफेक सुरु आहे. इस्रायलच्या बॉम्बहल्ल्यांनी गाझामध्ये प्रचंड विध्वंस केला आहे. गाझामध्ये 17 दिवसांत किमान 2 हजार नागरिक मारले गेल्याची माहिती मदत संस्थेने दिली आहे. पॅलेस्टिनी आरोग्य अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्रायली बॉम्ब हल्ल्यात आतापर्यंत 5 हजार 700 हून अधिक नागरिक मारले गेले आहेत.