Happy Hug Day 2023 : सगळीकडे गुलाबी वातावरण, प्रत्येकाच्या हातात लाल गुलाब, काही सुंदर असं गिफ्ट, चॉकलेट...बघावं तिकडे प्रेमाचा उत्साव (Valentine season 2023) ...हो हा प्रेमाचा उत्सवचं म्हणायला हवा ना...सध्या सगळे प्रेममय झाले आहेत कारण व्हॅलेंटाइन वीक 2023 (Valentine week 2023) साजरा केला जातोय. व्हॅलेंटाइन वीक 2023 म्हणजे प्रेमाचा सण...या प्रेमाच्या सीझनची खासयितच काही और असतं. इथे प्रत्येक दिवस काही तरी विशेष असतं. आज हग डे (Hug day 2023) आहे, म्हणजे आज प्रेमी युगुल एकमेकांना मिठी मारून आपलं प्रेम व्यक्त करणार. तुम्हाला आठवडतं का अभिनेता संजय दत्त हा मुन्नाभाई MMBS या चित्रपटात प्रत्येकाला जादूकी झप्पी द्यायचा. तो म्हणायचा मिठी (Importance of Hug day) मारुन सगळं टेन्शन नाहीस होतं. पण हे कितपत खरं आहे, असं तुम्हाला वाटतं असेल ना...पण किस करण्याचे जसे अनेक फायदे आहेत तसे मिठी (benefits of hug for relationship) मारण्याचेही आरोग्यास अनेक फायदे (benefits of hug for health) आहेत.  


बिनधास्त मारा जादू की झप्पी!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिठी मारल्याने शरीरात आनंदी हार्मोन्स तयार होतात. ऑक्सिटोसिन, डोपामाइन आणि सेरोटोनिन अशी या हॅप्पी हार्मोन्सची नावं आहेत. या प्रत्येक हार्मोनचा मानवाच्या शारिरावर आणि मेंदूवर वेगवेगळा प्रभाव होता. त्यामुळे आपल्या टेन्शन आलं असेल तर कोणी आपल्याला मिठी मारली तर आपण टेन्शनमुक्त होतो. आपल्या प्रिय व्यक्तीची नाराजी काही सेकंदात दूर करायची असेल तर त्याला मिठी मारा. त्यामुळे तुमचं नातं अजून घट्ट होतं. (happy Hug day 2023 valentine week Valentines day special amazing benefits of hug hugging relationship tips Health news marathi )



जगाचा विसर पडतो 


जेव्हा आपला प्रिय व्यक्ती आपल्याला मिठीत घेतो तेव्हा जगाचा विसर पडतो. आपल्या आजूबाजूला काय सुरु आहे हेदेखील आपण क्षणभर विसरून जातो. त्या एका मिठीत खूप आपलंस आणि सुरक्षित वाटतं. मनाची जी चलबिचल होतं असते ती शांत होते आणि रागाचा भरात होणार कृत्याला आळा बसतो. 


...म्हणून जोडीदाराला मिठी मारून झोपा


असं म्हटलं जातं की, जे जोडीदार आपल्या प्रिय व्यक्तीला मिठीत घेऊन झोपतात त्यांची झोप शांत आणि चांगली होते. दिवसभराचा ताण आणि थकवा दूर होतो. त्यामुळे तुमच्या आरोग्यास फायदा होता. 


संशोधनानुसार मिठी मारण्याचे फायदे 


एखाद्याला मिठी मारल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो, असं एका संशोधनात सिद्ध झालं आहे. जेव्हा एखाद्याला मिठी मारली जाते तेव्हा या काळात शरीरातील ऑक्सिटोसिन रक्तापर्यंत पोहोचते आणि रक्ताभिसरण सुधारते. यासोबतच स्ट्रेस हार्मोन कॉर्टिसोलही लेव्हलमध्ये येतो. यामुळे तुम्हाला टेन्शन फ्री वाटते आणि तुमची स्मरणशक्तीही चांगली राहते. तर सेरोटोनिन हार्मोन आपल्या तणावावर नियंत्रण ठेवण्याचं काम करते. डोपामाइन हा हार्मोन मानवी शरीरात एक रासायनिक संदेशवाहक म्हणून काम करतो. हा हार्मोन आपल्या मेंदूला अनेक चांगल्या गोष्टी करण्यास प्रवृत्त करतो.


याशिवाय मिठी मारल्याने हृदयाचे ठोके सामान्य होतात. 10 मिनिटे हात धरून ठेवण्यापासून ते 20 सेकंदांपर्यंत मिठी मारल्यास बीपी नॉर्मल होण्यास मदत होते.