जोरु का गुलाम? बायकोचे पाय धुवून पाणी पिणाऱ्या `या` व्यक्तीचा Video पाहिला का?
Couple Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना जोरु का गुलाम हा चित्रपट आठवतोय. तुम्ही पाहिला का हा व्हिडीओ?
Pakistani Couple Viral Video : इंटरनेटवर एक व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती दोन तरुणींच्या पायाशी बसला आहे. त्यातील एका महिलेचे तो पाय दाबताना दिसत आहे. हे पाहून नेटकरी अवाक् तर झाले आहेत. शिवाय त्याच्यावर खूप टीका होतेय. इंटरनेटवर धुमाकूळ घालत असलेला हा व्हिडीओ पाहून यूजर्सला जोरू का गुलाम या चित्रपटाची आठवण होतेय. जे नवरे आपल्या बायकोच्या मागेपुढे करतात त्याच्या प्रत्येक गोष्टीला होकार देतात त्यांना जोरू का गुलाम असं त्याला संबोधलं जातं.
'या' व्यक्तीचा Video पाहिला का?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक महिला रिपोर्ट पती पत्नीचे मुलाखत घेताना दिसत आहे. महिला रिपोर्ट आणि पत्नी सोफ्यावर बसले आहेत तर पती त्या व्यक्तीच्या पायाजवळ खाली बसला आहे. तो नवरा त्याच्या पत्नीचे पाय दाबताना दिसत आहे. एवढंच नाही तर तो एका भांड्यात पत्नीचे पाय पाण्याने धुतो आणि ते पाणी तो ग्लासमधून पिताना तुम्ही पाहू शकता. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. तर तो व्यक्ती घरातील सर्व कामं करतो आणि पत्नीला राणी सारखं ठेवतो.
ती रिपोर्ट त्या महिला विचारते की तुझ्या नवरा घरी काय काम करतो. त्यावर ती म्हणते तो फरशी पुसतो, भांडी घासतो आणि कपडेदेखील धुतो. तर तो माणूस पत्नीसाठी काही करु शकतो असं तो म्हणाला आहे. त्याच्यासाठी त्याची पत्नीच सर्वकाही आहे. आम्ही लोक आई, बहीण आणि मुलींच्या सौभाग्यासाठी प्रार्थना करतो. पत्नीही ही सुद्धा कोणाची तरी बहीण आणि मुलगी आहे ना.
या दोघांच्या संसाराला तब्बल 14 वर्षे झाली आहेत. तर या दोघांना भेटून 16 वर्ष उलटून गेली आहे. हा व्हिडीओ @prof_desi ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करण्यात आला. या व्हिडीओला आतापर्यंत 1 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर या व्हिडीओ मजेदार प्रतिक्रिया यूजर्सकडून येत आहेत.
व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने लिहिलंय की, 'सोशल मीडियावर काय पाहावं लागंतंय.' दुसऱ्या युजरने लिहिलंय की, 'अरे भाऊ, तू काय दाखवतोय आहेस.' त्याचवेळी दुसऱ्या युजरने म्हणतो, 'स्त्री पूजनीय असते.'