VIDEO : रस्त्याच्या मधोमध त्याने तिला लहान मुलासोबत गाडीतून खाली खेचलं अन् मग...
Couple Fight Video : नवरा बायकोमधील भांडणामध्ये चिमुकल्याचा हा मन हेलावून टाकणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Couple Fight Video : सोशल मीडियावर रोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मनोरंजक असतात तर काही आपल्याला हसविणारे असतात. काही व्हिडीओ तर माहितीपूर्ण असतात. वेगवेगळ्या विषयावर हे व्हिडीओ असतात. या इंटरनेटच्या जगात काही व्हिडीओ इतके धक्कादायक आणि मन हेलावून टाकणाऱ्या असतात की आपल्या तळ मस्तकातील आग डोक्यात जाते. असाच एक भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल आहे. ज्यामध्ये पालकांच्या चुकीची शिक्षा एका तान्हुल्या जीवाला भोगावी लागतेय. (He pulled her down from the car with the child in the middle of the road and then Couple Fight Video viral internet)
पालकांमधील भांडण्यामुळे चिमुकल्या...
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता ट्रॉफिकमध्ये एका काळा रंगाच्या गाडीतून एक व्यक्ती एका महिलेला खेचून गाडी बाहेर काढतो. त्या महिलेजवळ एका लहान चिमुकलाही आहे. तो माणून मागे पाहत नाही की पुढे पाहत नाही, बस रागाच्या भरात त्या चिमुकल्यासोबत त्या महिलेला गाडीतून बाहेर रस्त्यावर फेकतो. तो चिमुकला कावराबावराहून रडताना दिसतोय. ती महिला परत त्या व्यक्तीला गाडीत जाते आणि ते दोघे भांडण्यात व्यस्त होतात. तो चिमुकला रस्त्यावर रडत असतो. तेवढ्यात एक व्यक्ती तिथे येतो आणि हे सर्व पाहून त्याला धक्का बसतो आणि तो त्या चिमुकल्याला जवळ घेतो. त्या चिमुकल्याचा आई वडील भांडण्यात इतके व्यस्त होते की, त्यांचं चिमुकल्याकडे लक्ष नव्हतं.
नवरा बायकोमधील भांडण आणि संघर्ष खूप वेळ रस्त्यावर सुरु होता. पालकांमधील या संघर्षाचा त्या चिमुकल्या जीवावर परिणाम होत होता. हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @NoCapFights नावाच्या यूजर्सने पोस्ट केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत चार दशलक्षहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक जण आपल्या प्रतिक्रिया या व्हिडीओवर देत आहेत.
एका यूजरनं लिहिलं की, 'ही कसली मारामारी आहे?' दुसऱ्या युजरनं लिहिलंय की, 'व्हिडीओमधील पालक खूप वाईट आहेत.' त्याचवेळी आणखी एका यूजरने लिहिलंय की ' त्या निर्दोष जीवचा काय दोष होता?' हा व्हिडीओ सोशल मीडियावर पाहून नेटकरी संतापले आहेत. पालकांच्या प्रेमाने लहान मुलांचं भविष्य उज्वळ होतं, तर त्यांच्या संघर्ष नात्यातील तणावातून त्यांचं आयुष्य उद्धवस्त होतं.