लग्न हे दोन जीवाचं अतूट नातं आणि सोबत दोन कुटुंबाच मिलन असतं. आयुष्यातील सर्वात मोठा उत्साह आणि आनंदाचा क्षण असतो. या सोहळ्याला कुटुंबासह नातेवाईक, मित्रपरिवार खूप मोठा गोतावळा असतो. भारतात तर कुटुंबातील एवढं मंडळी असतात की, कोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही हा प्रश्न असतो. लग्नातील एकाच बाजूचे पाहुणे अनेक वेळा हजाराच्या वरती असतात. मग अशावेळी पाहुण्यांचा यादीला कात्री लावावी लागते. गेल्या काही वर्षांमध्ये भव्य आणि ग्रँड सोहळा हे सोशल मीडिया ट्रेंड बनला आहे. पण या जगाचा पाठीवर एक असं शहर आहे जिथे लग्नासाठी पाहुणे ही पैसे देऊन बोलवली जातात. त्यामागील कारण जाणून तर तुम्ही अवाक् व्हाल. 


इथे पाहुण्यांना पैसे देऊन बोलवतात!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही बोलत आहोत. दक्षिण कोरियातील लग्नांबद्दल. इथे लग्नात मोठ्या संख्येने पाहुणे बोलवण्यासाठी पैसे दिले जाता. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, या शहरात लग्नात पाहुणे देण्यासाठी एजन्सीज वेडिंग गेस्ट्सचा बिजनेस करतात. या एजन्सीज लग्नात पैसे देऊ तुम्हाला हवी तेवढी पाहुणे देतात. मात्र कोरोना काळात या कंपनींवर गदा आली होती. आता या कंपन्या पुन्हा जोर धरत आहेत.  Hagaek Friends या सारख्या अनेक कंपन्या वधू किंवा वराच्या कुटुंबाचे जवळचे नातेवाईक म्हणून माणसं पुरवतात. ही माणसं लग्नात दिलेली पाहुण्यांची भूमिकाही उत्तम पार पाडतात. ही पाहुणे मंडळी अगदी ट्रेंड असतात लग्नाच्या संमारभात त्यांचा वावर पाहून तर कोणीही म्हणार नाही ही भांड्यांनी आणलेली माणसं आहे. 


दक्षिण कोरियात पूर्वी 99 हून अधिक पाहुणे हे लग्नात उपस्थित राहू शकायचे. आता ही संख्या 250 एवढी करण्यात आली आहे. एजन्सीजनं सांगितलं, जसं जसे निर्बंध शिथील होत गेले त्यांना भरपूर कॉल यायला लागले आहेत. आता लोकांना मोठ्या संख्येने पाहुणे लग्नाला हवे असतात. भांड्याने पाहुणे पाठवण्यासाठी एका व्यक्तीचं भाडही ठरविण्यात आलंय. एक पाहुणा 1500 पेक्षा जास्त पैसे घेत असतो.  


'या' कारणामुळे लग्नात बोलवतात पाहुणे !


लग्नात पैसे देऊन पाहुणे बोलवण्यामागील काहीही तेवढंच महत्त्वाच आहे. दक्षिण कोरियामध्ये लग्नात जितके जास्त पाहुणे तितकं तुमचं सोशल सर्कलही मोठं असं मानलं जातं.  म्हणू या देशात पैसे देऊन मोठ्या संख्येने लग्नासाठी पाहुणे बोलवली जातात. मग ती मंडळी वधूकडून असतात तर वराकडूनही असतात.