Tujia Community: जगभरात अनेक ठिकाणी विविध भागात लग्नाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. काही रिती-रिवाज तर इतके वेगळे असतात की ते ऐकूनच आश्चर्य वाटत असतील. चीनच्या तुजिया समाजात लग्नाच्या आधी एक विचित्र परंपरा पाळली जाते. यात रडण्याची परंपरा (Crying Wedding Custom) पाळली जाते. या परंपरेनुसार वधुला लग्नाच्या 30 दिवसांआधी रोज एक तास रडण्यास सांगितले जाते. ही परंपरा फक्त तुजिया समाजाची संस्कृतीचा महत्त्वपूर्ण हिस्सा आहे. या समाजात नाते, प्रेम आणि भावनांना व्यक्त करण्यासाची एक खास पद्धत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुजिया समाज चीनच्या दक्षिण-पश्चिम क्षेत्रास स्थित आहे. ज्यात हुपेई (Hubei), हुनान (Hunan) आणि गुइझोउ (Guizhou) प्रांत प्रमुख आहेत. या समाज खास सांस्कृतिक परंपरा आणि रिती-रिवाजांसाठी ओळखले जाते. ज्यात लग्नाचे विविध विधी असतात. तुजिया लोक त्यांच्या प्रथा आणि परंपराबाबत अभिमान बाळगतात. त्यांचे लग्न दुसऱ्या समुदायापेक्षा वेगळा असतात. यातील एक रडण्याची परंपरा ही खूप वेगळी असते. या परंपरेमुळं तरुणींना भावनिक आणि मानसिकरित्या तयार केले जाते. 


ही परंपरा साधारणपणे लग्नाच्या 30 दिवस आधी सुरू करतात. नववधुच्या कुटुंबीयांकडे या प्रथेचे पालन केले जाते. या दरम्यान नववधु प्रत्येक दिवशी एक तास रडते आणि या दरम्यान कुटुंबातील लोक महिलेसोबत असतात आणि गाणी गातात. ही गाणी पारंपारिक असतात जे नववधुच्या आयुष्यात लग्नानंतर होणारे बदल आणि भावनांबद्दल सांगतात. पहिल्या दिवशी नववधु एकटची रडते आणि तिची आई आणि आजी तिच्यासोबत गातात. सुरुवातीच्या दिवसात हे वातावरण भावूक करणारे असते. पण जस जसं दिवस पुढे सरतात तसे नववधुच्या रडण्याची पद्धत बदलते. ही प्रक्रिय तिच्यातील संघर्ष आणि बदल अधोरेखित करते. एक महिना रडण्याची परंपरेदरम्यान नववधुच्या घरातील नातेवाईक आणि मित्रांचे समर्थन मिळते. प्रत्येक दिवशी या परंपरेबरोबरच एका सामूहिकरित्या परिवार आणि समाजाचे समर्थन आणि प्रेम नववधुला मिळते.