Hindenburg Research Latest News : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी ओळख असणाऱ्या (Gautam Adani) गौतम अदानी यांच्या कोट्यवधींच्या संपत्तीला सुरुंग लावण्याचं काम हिंडनबर्ग अहवालानं केलं. क्षणात अदानींच्या श्रीमंतीचा डोलारा कोसळला. अदानी यातून सावरत नाहीत, तोच Hindenburg Research कडून आणखी एक गौप्यस्फोट करण्यात आला.  हिंडनबर्ग रिसर्च आणखी एक धक्कादायक अहवाल लवकरच जारी करणार असल्याचं कंपनीनं म्हटलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय वेळेनुसार बुधवारी मध्यरात्री सुमारे सव्वा वाजताच्या सुमारास हिंडनबर्गच्या अधिकृत (twitter) ट्विटर हँडलवरुन आणखी एक धक्कादायक रिपोर्ट लवकरच प्रसिद्ध करणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. क्षणातच हे ट्विट व्हायरल झालं आणि आता हा रिपोर्ट कोणता गौप्यस्फोट करणार याकडे भारतीय शेअर बाजाराचं लक्ष लागून राहिलं आहे. (hindenburg to publish new report soon new another big one might be at risk latest Marathi news)



जानेवारी महिन्यात हिंडनबर्गनं जारी केलेल्या रिपोर्टमुळे जगातल्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असणारे गौतम अदानी आणि अदानी समूहात गुंतवणूक करणाऱ्यांचे जवळपास 10 लाख कोटी रुपये मातीमोल झाले. हिंडनबर्गच्या त्याच रिपोर्टमध्ये करण्यात आलेल्या आरोपांची संयुक्त संसदीय समिती मार्फत चौकशी करण्याची मागणी काँग्रेसच्या नेतृत्वात विरोधकांनी लावून धरली आहे त्यामुळे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात दोन्ही सभागृहांचं कामकाज होऊ शकलेलं नाही त्यामुळे आता आणखी एक रिपोर्ट येणार असल्यानं सगळ्यांचे डोळे हिंडनबर्गच्या नव्या रिपोर्टकडे लागले आहेत. 


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांना उधाण 


हिंडनबर्गकडून पोस्ट करण्यात आलेल्या सूचक ट्विटनंतर काही युजर्स त्यावर व्यक्त झाले. 'आम्ही आशा करतो, की यामध्ये आता भारतीय अर्थव्यवस्थेविषयी काहीही नसावं', असं म्हणत त्या युजरनं यावेळी एखाद्या चीनी कंपनीचा खरा चेहरा समोर आणा असं लिहिलं. तर कुणी, नेमकं कोणाचं नाव समोर येणार याबाबतची उत्सुकता व्यक्त केली. 


हेसुद्धा वाचा : Hindenburg Vs Gautam Adani : कोण आहे Nathan Anderson? ज्याच्या एका रिपोर्टमुळं गौतम अदानींच्या श्रीमंतीचा डोलारा कोलमडला


हिंडनबर्गविषयी थोडं... 


हिंडनबर्ग ही एक Financial Research कंपनी आहे. ही कंपनी स्टॉक, क्रेडिट आणि बड्या संस्थांमधील व्यवस्थापनात होणाऱ्या गैरव्यवहार, छुपे व्यवहार या साऱ्यांवर नजर ठेवून असते.