पाकिस्तानात हिंदू मंदीरात तोडफोड करुन लावली आग
स्थानिक मौलवींच्या नेतृत्वात मंदिर तोडल्याची माहिती
नवी दिल्ली : पाकिस्तानात एका हिंदू मंदीरात तोडफोड करुन आग लावण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. खैबर पख्तूनख्वा प्रांतातील करक जिल्ह्यात ही घटना घडली आहे. मंदिराचा विस्तार करण्यासाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी घेण्यात आली होती. मात्र या मुद्यावरुन काही मौलवींनी जमावाला भडकवलं. यावेळी प्रशासकीय अधिकारी आणि पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. मूकपणे घटना पाहत होते, असा आरोप होतोय.
हिंदू मंदि्हिडीओ राची तोडफोड करतानाचा व्हिडिओ ‘वॉयर ऑफ पाकिस्तान माइनॉरिटी’नावाने ट्वीटर हॅंडलवर शेअर करण्यात आलाय. करक जिल्ह्यात जमावाने मंदिराची तोडफोड केली. यामागचे कारण अद्याप कळाले नाहीय असे यात म्हटलंय.
हिंदुंनी मंदिराच्या विस्तारासाठी प्रशासनाकडे विनंती केली होती. यानंतर स्थानिक मौलवींच्या नेतृत्वात मंदिर तोडल्याची माहिती एका पत्रकाराने दिली.
स्थानिक प्रशासन आणि पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेतली. एका पाकिस्तानी महिला पत्रकाराने या घटनेची निंदा केली.