Kitchen hacks : असं म्हणतात ज्या घरात्या स्वयंपाकघरात स्वच्छता असते, त्या घरात कोणताही आजार टीकत नाही. कारण ही सर्व समीकरणं अन्नपदार्थांशी जोडलेली असतात. घरातील स्वयंपाकघरात ज्या शेगडीवर, गॅस स्टोव्हवर आपण जेवण शिजवतो, तिथं अनेकदा घाई- गडबडीमुळे एकच धांदल उडते. (Gas Stove)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेवण बनवत असताना अनेकदा शेगडीवर तेल, पाणी, आमटी असं बरंच काही सांडतं आणि संपूर्ण शेगडी खबार होते. हे पदार्थ फार काळ या पृष्ठावर टिकून राहिल्यास त्यामुळं ते काढतानाही नाकी नऊ येतात. शेवटी शोध सुरु होतो यावर उपाय म्हणून सर्वोत्त क्लिनिंग लिक्विड खरेदी करण्याचा. पण, आता त्याचीही गरज नाही. (home grooming kitchen hacks Gas stove cleaning tips and tricks )


काही सोप्या उपायांनी तुम्हीही गॅस शेगडी क्षणात चमकवू शकता. 


पाणी- पाणी उकळवून ते डाग असणाऱ्या भागांवर टाका आणि काही क्षण तसंच ठेवा. त्यानंतर एक स्पंज किंवा लिक्विड सोपच्या मदतीनं डाग स्वच्छ करा. शेगडीवर काच असल्यास पाणी जास्त गरम नसेल याची मात्र काळजी घ्या. 


अमोनिया
औषधांच्या दुकानातून अगदी सहजपणे अमोनिया खरेदी करता येऊ शकतो. अमोनियापासून गॅस स्वच्छ करण्यासाठी रात्रीच्या वेळी बर्नर आणि ग्रेट्स त्यामध्ये भिजवून ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते स्वच्छ पाण्याने धुवा. 


बेकिंग सोडा आणि हायड्रोजन पॅरोक्साइड
गॅसवर बेकिंग सोडा आणि हायड्रोजन पॅरोक्साइड टाका आणि काही वेळ तसंच ठेवा. तुम्ही पाहू शकाल की डाग हळूहळू स्वच्छ होताना दिसतील. 


मीठ आणि बेकिंग सोडा 
एक चमचा मीठ आणि एक चमचा बेकिंग सोडा घ्या आणि ते एकत्र करुन हे मिश्रण एका स्पंजनं गॅस स्वच्छ करण्यासाठी वापरा. त्यानंतर गॅस स्वच्छ पुसून घ्या. 


बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस मिसळूनही तुम्ही अशाच पद्धतीचं मिश्रण तयार करून स्पंजऐवजी लिंबाच्या तुकड्यानंच मिश्रण गॅसला लावू शकता. यामुळंही गॅस क्षणात स्वच्छ होईल.