Travel Stories : प्रवास करायला कोणाला आवडत नाही? मुद्दा असा, की प्रवास करायला अनेकांना आवडतो पण, तो सर्वांनाच परवडतो असं नाही. पण, आता तुम्हाला याचीही फार चिंता करण्याची गरज नाही. कारण, फिरस्त्यांना प्रवास करण्यासाठी आता चक्क विमानाची तिकीटं फुकटात मिळत आहेत. आता ही तिकीटं कोण आणि कुठे मिळताहेत? तुम्हालाही असा प्रश्न पडला ना? (Honk kong to give 500000 ticketes to tourists to boost tourism)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोविडमुळं प्रभावित झालेल्या पर्यटन क्षेत्राचा (tourism) पुन्हा एकदा विकास घडवून आणण्यासाठी हाँगकाँगकडून HK $ 2bn ($ 254.8m; £ 224.3m) इतकी किंमत असणारी 500,000 विमान प्रवासाची तिकीटं मोफत देणार आहे. 


काही दिवसांपूर्वीच इथं कोविड (Covid) प्रतिबंधात्मक नियमांमध्ये शिथिलता आणण्यात आली. असं असलं तरीही काही महत्त्वाच्या एअरलाईन्स मात्र पुन्हा रुळावर येण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहेत. यावर तोडगा म्हणून नियमांमध्ये शिथिलता आणत प्रवाशांना वाव देण्याबाबतचा विचार येथील यंत्रणांनी केला आहे. 


अधिक वाचा : NASA ने शेयर केले Solar Flare चे अद्भुत फोटो, पृथ्वीवर काय होणार परिणाम?


सध्याच्या घडीला शहरात येणाऱ्यांना क्वारंटाईन किंवा तत्सम कोणत्याही नि.मांचं पालन करावं लागणाल नाही. किंबहुना इथं येण्यापूर्वी कोविडच्या Negative रिपोर्टचीही गरज नसल्याची माहिती समोर आली आहे. उलटपक्षी प्रवाशांनी इथं पोहोचल्यानंतर तीन दिवसांत संभाव्य संक्रमणांपासून वाचण्यासाठी चाचणी करावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. 


हाँगकाँगमध्ये (Hong Kong) प्रवास करण्यासंदर्भातील ही माहिती समोर येताच इथं येणाऱ्यांमध्ये झपाट्यानं वाढ झाली आहे.