नूरसुल्तान : थराराचा अनुभव प्रत्येकालाच घ्यायचा असतो. हा थरार कधी तुमच्या जीवावर बेतेल काही सांगता येत नाही. असाच प्रकार एका तीन मुलांच्या आईसोबत घडला आहे. या आईला 'फ्री-फ्लाइंग स्पोर्ट्स' (Free-Flying Extreme Sport) चा आनंद घेत होती. मात्र तिची एक चूक चांगलीच महागात पडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिला सेफ्टी रोप शिवाय हॉटेलच्या छतावर उडी मारली आहे. कोणत्याही सेफ्टीचा आधार न घेता या महिलेने उडी मारल्यामुळे ती सरळ खाली कोसळली. त्यानंतर त्या महिलेले तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलं. 



'डेली स्टार' च्या अहवालानुसार, 33 वर्षीय येवगेनिया लिओन्तेएवा साहसची आवड पूर्ण करण्यासाठी कझाकस्तानच्या कारागांडा येथील एका हॉटेलच्या टेरेसवर गेली. ट्रेंड लोकांनी हा खेळ आयोजित केला होता. येवगेनियाने सेफ्टी रोप न लावता 82 फूट वरून उडी मारली.



या अपघाताचा एक व्हिडिओही समोर आला आहे. उडी मारल्यानंतर, येवगेनियाला समजले की तिच्याकडे सुरक्षित दोरी नाही, तेव्हा ती ओरडू लागली. त्यांना पाहून आजूबाजूचे लोकही किंचाळले. येवगेनियाला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. परंतु गंभीर दुखापती आणि जास्त रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी तिची शस्त्रक्रियाही केली, पण काही काळानंतर येवगेनियाचा मृत्यू झाला.


साक्षीदारांचे म्हणणे आहे की, येवगेनिया लिओन्टीएवाने अचानक उडी मारली. ज्यामुळे प्रशिक्षकाला सेफ्टी रोप लावण्याची संधी मिळाली नाही. तिच्या मृत्यूपूर्वी येवगेनिया यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. ज्यात तिने आपल्या थराराबाबत लिहिलं होतं. मृत महिलेला 14 वर्षांखालील तीन मुले आहेत. या अपघातामुळे संपूर्ण कुटुंब शोकात आहे. जिथे अपघात झाला, ती जागा आणि तेथील हा थरार बंद करण्यात आला आहे.