ऑपरेशनच्या नावाखाली कोट्यवधींची लूट, पेशंट बिल पाहून....
हॉस्पिटलचं बिल पाहून आकडी येईल.... ऑपरेशनच्या नावाखाली कोट्यवधींची लूट
वॉशिंग्टन : गब्बर सिनेमात हॉस्पिटलची दुरावस्था दाखवणारा सीन डोळ्यासमोर तरळेल अशी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेला 1 लाख रुपयांचे उपचार असल्याचं सांगून तिच्याकडून कोट्यवधी रुपये उकळले आहेत.
या महिलेला कोट्यवधी रुपयांचं बिल पाठवण्यात आलं. रुग्णालयात जायचं म्हटलं की लाखो रुपये उकळले जातात. असाच एक प्रकार समोर आला आहे. हॉस्पिटलने 1 लाख रुपयांऐवजी 2.3 कोटींचं बिल महिलेला पाठवलं. या प्रकरणात महिलेनं न्यायासाठी कोर्टाकडे मदत मागवली.
महिलेला सर्जरीसाठी 1 लाख रुपये होईल असं सांगून तिला 2.3 कोटी रुपयांचं बिल हॉस्पिटलने लावलं. यामध्ये तिला न सांगता अनेक गोष्टींसाठी बिल लावण्यात आलं. हॉस्पिटलकडून होणारी लूट लक्षात घेऊन महिलेनं तक्रार दाखल केली. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर हॉस्पिटलला मोठा धक्का बसला.
कोलोराडो सुप्रीम कोर्टाने महिलेच्या बाजूने निकाल दिला. महिलेनं स्पाइनल फ्यूजन सर्जरी केली होती. या महिलेचं नाव लिजा फ्रेंच आहे. 2014 मध्ये हा सगळा प्रकार घडला.
हॉस्पिटल महिलेला सांगितल्या प्रमाणेच चार्ज करेल पण बिल पाठवल्याप्रमाणे महिला वरचे ज्यादा पैसे भरणार नाही. या महिलेला इंशुरन्स कंपनीने 57 लाख रुपये दिले. वरचे 74 हजार अमेरिकी डॉलर्स महिलेला भरावे लागले.
अमेरिकेत 2022 वर्षाची सुरुवात होताच एक नवीन कायदा आला. ज्याचे नाव होते 'नो सरप्राइजेस ऍक्ट'. ज्यामध्ये अनेक प्रकारच्या अनपेक्षित वैद्यकीय शुल्कांवर बंदी घालण्यात आली होती, जी 'आउट ऑफ नेटवर्क प्रोव्हायडर्स'कडून आकारण्यात आली होती.