नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी समुद्राच्या लाटांवर रथ वाहून आला होता. आता समुद्राच्या लाटेवर घर तरंगतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समुद्रकिनाऱ्या शेजारी एक सुंदर भलमोठं घर दिसत आहे. समुद्राची एक मोठी लाट येते आणि घर कोसळतं. पण हे घर पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळत नाही. तर ते समुद्रावर तरंगायला लागतं. काही सेकंद हे समुद्रावर तरंगताना दिसत आहे. 


या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ही दुर्घटना घडली तेव्हा घरात कोणी नव्हतं असं सांगितलं जात आहे. @CapeHatterasNPS  24265 ओशन ड्राइव, रोडांथे इथे हे घर रिकामं होतं. अटलांटिक महासागराच्या विशालकाय लाटांचा हा व्हिडीओ समोर आला आहे. या लाटा आपल्यासोबत घरालाही आतमध्ये खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. 



या लाटांवर काही सेकंद घर तरंगताना दिसलं त्यानंतर घर हळूहळू पाण्यात बुडताना दिसलं. या व्हिडीओला 14 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. मोठी दुर्घटना टाळण्यासाठी अशा भागांमध्ये सरकारने बंदी आणायला हवी असंही काही युजर्सने म्हटलं आहे.