मुंबई : कोरोना व्हायरसमुळे जगाची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. कोरोनामुळे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसानही झालं आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडूनही कोरोनाला जागतिक साथ म्हणून घोषित करण्यात आली आहे. ११९ देशांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला आहे. जगातल्या १ लाख २० हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत ४,५०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागच्या २४ तासात जगभरात कोरोनाचे ४,५०० रुग्ण आढळले आहेत.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इटलीमध्ये १० हजारांपेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर इराणमध्ये आणखी ७५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. इराणमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची संख्या ४२९ झाली आहे.

भारतामध्ये आतापर्यंत कोरोनाचे ७३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यातले ५६ रुग्ण भारतीय तर १७ रुग्ण परदेशी नागरिक आहेत. केरळमध्ये कोरोनाचे सर्वाधिक १७ रुग्ण आहेत. महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे ११ रुग्ण आढळले आहेत. यातले ८ रुग्ण पुण्याचे २ मुंबईचे आणि १ रुग्ण नागपूरचा आहे. पुण्याचे रुग्ण एकाच ग्रुपमधून परदेशी गेले होते, तर नागपूरचा रुग्ण अमेरिकेवरून परतला आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतात येणाऱ्या सर्व परदेशी पर्यटकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. १५ एप्रिलपर्यंत सर्व पर्यटक व्हीसांना सरकारने स्थगिती दिली आहे. यातून केवळ डिप्लोमॅटीक व्हीसा, युएन व्हिसा आणि इतर ऑफिशिअल व्हिसांना वगळण्यात आले आहेत. परदेशी नागरिकांना भारतात १५ एप्रिलपर्यंत प्रवेशबंदी देण्यात आली आहे.

भारतीय राज्यातील कोरोना रुग्ण

दिल्ली- ६

हरियाणा- एकूण १४ (सगळे परदेशी नागरिक)

केरळ-१७

राजस्थान- एकूण ३ (२ परदेशी नागरिक)

तेलंगणा- १

उत्तर प्रदेश- एकूण ११ (१ परदेशी नागरिक)

लडाख- ३

तामिळनाडू- १

जम्मू-काश्मीर- १

पंजाब- १

कर्नाटक- ४

महाराष्ट्र- ११