गेल्या 10 वर्षात असा बदलत गेला सूर्य, नासाने शेअर केला व्हिडिओ
10 वर्षात सूर्यात झाले बरेच बदल
नवी दिल्ली : गेल्या 10 वर्षात सूर्यात मोठा बदल झाला आहे. नासाने याबाबत 10 वर्षात झालेल्या बदलाचा अभ्यास केला आहे. या दरम्यान सूर्याचे जवळपास 42.5 कोटी फोटो काढण्यात आले. सोबतच 2 कोटी गिगाबाईटचा डेटा देखील जमा केला गेला. या माहितीच्या आधारे नासाने संशोधन केलं. ज्यामध्ये असं समोर आलं की, गेल्या 10 वर्षात सूर्यात अनेक बदल झाले.
नासाच्या Solar Dynamics Observatory ने गेल्या 10 वर्षात प्रत्येक 0.75 सेंकदवर सूर्याचे फोटो घेतले. त्यानंतर प्रत्येक तासातील 1 फोटो घेत त्यावरुन 61 मिनिटांचा एक व्हिडिओ तयार करण्यात आला.
नासाने म्हटलं की, सूर्य बराच बदलला आहे. व्हिडिओमध्ये ते दिसत आहे. नासाच्या माहितीनुसार, सूर्याचं चुंबकीय क्षेत्र 10 वर्षानंतर पूर्णपणे बदलून जातं. या व्हिडिओत 10 वर्षातील सूर्याची गती आणि वेगवेगळे बदल दिसत आहे.
एसडीओने सूर्याचा बराच अभ्यास केला आहे. अंतराळ यान आणि सूर्याच्या मधून जेव्हा पृथ्वी आणि चंद्र गेली तेव्हा काळी फ्रेम आली आहे.