Humans clothes wearing History : एकपेशीय सजीवापासून ते मानवाच्या उत्पत्तीपर्यंत निसर्गाला कोट्यावधी वर्षे लागले.  मानवाची उत्क्रांती कशी झाली हे आपण सर्वांनीच शाळेत शिकले आहे.  उत्क्रांतीच्या ओघात माकडासारखा प्राणी जन्माला आला. हा प्राणी एप म्हणून ओळखला जात असे. त्याला शेपूट नव्हते. त्याचे डोके माकडापेक्षाही मोठे होते. त्याच्या पाठीत बाक होता आणि हा प्राणी दोन पायावर चालत असे. त्याचे हात गुडग्यापर्यंत लांब होते. त्याच्या भुवयावर जाड केस होते व संपूर्ण शरीरभर केस होते.  हा प्राणी म्हणजेच आदिमानव. त्यानंतरच्या काळात आदिमानवाची उत्क्रांती होऊन त्याचा मानव झाला. होमो इरेक्टस आणि होमो सेपिअस असे मानवाच्या उत्क्रांतीचे 2 टप्पे मानले जातात. होमो सेपिअस म्हणजे बुद्धिमान मानव. यानंतर मानवाची प्रगती होत गेली. आधी मानव हा झाडांची पाने आणि प्राण्यांची कातडी याने आपले शरीर झाकत होता. मात्र,  मानवाने कपडे घालणे केव्हापासून सुरु केले?  या प्रश्नामागे 170,000 वर्ष जुना इतिहास आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अतिप्राचीन काळात मानव प्राण्यांची कातडी आणि झाडांची साल यांनी आपला देह झाकत होता. सध्या 'वस्त्र' किंवा 'कापड' हे मानवाच्या आवश्यक गरजांपैकी एक आहे. अगदी राजे महाराजांच्या काळापासून वस्त्र हे स्टेटस सिम्बॉल मानले जातात.  आदिमानवाने पहिलं वस्त्र केव्हापासून वापरायला सुरुवात केली याचा शोध घेतला असता यामागे 170,000 वर्ष जुना इतिहास सापडतो.  


मानवाने हिमयुगानंतर प्रथम कपडे घातले  असे देखीला काही संशोधक सांगतात. मानवाने कपडे घालण्यास कधीपासून सुरुवात केली याचा शोध घेण्यासाठी संशोधकांनी उवांचा अभ्यास केला. Molecular Biology and Evolution जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आले. यासाठी उवांच्या DNA चा अभ्यास करण्यात आला. यासाठी केसांतील उवांचे निरीक्षण करण्यात आले. यानंतर कपड्यांवर असलेल्या उवांचा अभ्यास करण्यात आला. यानंतर कपड्यांवर आढळणाऱ्या उवांचा अभ्यास करण्यात आला. साधारण 17 लाख वर्षांपूर्वी मानवाच्या कपड्यांमध्ये उवांचे अवशेष सापडले. यावरुन 17 लाख वर्षांपूर्वी मानवाने प्रथम कपडे परिधान करायला सुरुवात केली असावी असा दावा अभ्यासकांनी केला आहे.